सोलापुर महापालिका निवडणुकीत गायकवाड, शेख व जाधव आडनावाचे उमेदवार सर्वाधिक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुर महापालिकेतील १०२ नगरसेवकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी एकूण ५६४ उमेदवार रिंगणात असून, त्यांची यादी पाहता काही रंजक तथ्ये समोर येत आहेत.
एकूण २६ प्रभागांमध्ये सर्व पक्षीय व अपक्ष उमेदवारांचा अभ्यास केल्यास शेख आडनावाचे २७, गायकवाड आडनावाचे २५ आणि जाधव आडनावाचे १५ उमेदवार आहेत. तसेच काही प्रभागांमध्ये राजू, पूजा, विजय, मोहम्मद व किरण या नावांचे उमेदवार वर्चस्व गाजवत आहेत.
विशेषतः प्रभाग २२ मध्ये गायकवाड आडनावाचे ९ उमेदवार असून त्यानंतर जाधव (७) व शेख (५) आडनावाचे उमेदवार आहेत. त्यामुळे मतदारांना उमेदवाराचे नाव, आडनाव व चिन्ह पाहून सावधपणे मतदान करावे लागणार आहे.
प्रभाग ७ ब मध्ये मतदारांची परीक्षाच असेल, कारण येथे तीन मनिषा नावाच्या उमेदवारांचे मुकाबले आहे. त्यांचे आडनाव व पक्ष खालीलप्रमाणे आहेत:
1. मनिषा कणसे – राष्ट्रवादी काँग्रेस (अ)
2. मनिषा माने – राष्ट्रवादी काँग्रेस (श)
3. मनिषा भोसले – रासप
याशिवाय काही प्रभागांमध्ये 'लक्ष्मी', 'लक्ष्मीबाई' व 'विजयलक्ष्मी' असे समान नावही असल्याचे दिसून आले आहे.
महापालिकेतील १०२ जागांपैकी २५ जागांवर समान नाव किंवा आडनाव असल्याने मतदारांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारांनी पक्षाचे नाव, चिन्ह व आडनाव यावर भर देऊन मतदान करावे, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
*समान नाव व आडनावाचे प्रमुख आकडे:*
* शेख – २७
* गायकवाड – २५
* जाधव – १५
* भोसले – ९
* पाटील, काळे – ८
* शिंदे, चव्हाण, पठाण – ७
* बिराजदार, राठोड, कुरेशी, सय्यद – ६
* कोळी, पटेल, माने, म्हेत्रे – ५
* बनसोडे, जमाजार, सुरवसे, मुल्ला, हत्तुरे, कांबळे – ४
* राजू, पूजा, विजय, मोहम्मद, किरण – ५
* गीता, अहमद, कल्पना, गणेश, जुबेर, अर्चना, श्रीशैल – ४
मतदारांनी सावधगिरीने मतदान करणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांचे आवाहन आहे.
0 Comments