पुणे (कटूसत्य वृत्त):- पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार भाजप उमेदवारावर जोरदार टीका करताना दिसले. ते म्हणाले, "मी मोठ्या काकांचा पुतण्या आहे. माझा काका तुझ्या बापापेक्षा खूप मोठा आहे." या विधानामुळे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आधीच असलेल्या तणावाला अधिकच दुमडण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिकेच्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी वेगवेगळ्या प्रभागांना भेटी देऊन मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले. त्यांनी पुण्यात रोड शोही आयोजित केला.
रोड शोदरम्यान पवारांनी भाजप उमेदवार सुरेंद्र पठारे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. ते म्हणाले, "मी शब्दांचा पक्का आहे. उद्याच्या निवडणुकीत तुम्हाला कुणाला तरी मत द्यायचे आहे. तुम्ही मागे अनेकांना मतदान केले. पूर्वी ते घड्याळावर निवडून आले. तुम्ही आम्हाला सत्ता द्या. या भागातील टँकर माफियांचे कंबरडे मोडले नाही, तर अजित पवार नाव नाही सांगणार."
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्षांनी आक्रमक रणनीती आखली असून, प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यातून मतदारांवर दबाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
0 Comments