+++ पितरांचे नाटक +++
भटजी पुरोहित बुवा एका गावात रामाच्या घरी श्राध्द पूजा साठी पितृपक्षात जातो. हे सर्व त्यानेच सांगितले होते. भीती घातली होती. रामाने आईला सांगून केली होती. भटजी पोचतो. सर्व जय्यत तयारी झालेली असते.
भटजी - अरे रामा. आटोपले काय सगळे ?
रामा - होय भटजी बुवा. पण तुम्ही बरेच अगोदर आले.
भटजी - अरे रामा, थोडेसे पूजेचे साहित्य वाढवावे लागते. ते तूला सांगण्यासाठी मी लवकर आलोय.
रामा - भटजी बुवा, काय काय सामान पाहिजेत ते सांगा. लगेच ठेवतो.
भटजी - अरे रामा , आज सकाळी सकाळी तुझे वडिल माझ्या स्वप्नात आले होते. ते म्हणाले भटजी बुवा, तुम्ही दुपारी पितर पूजा करायला रामाकडे जाल तेंव्हा त्याला सांगा की माझ्या संदुकात पाच तोळे सोन्याचे कडे आहे. ते आजच्या पूजेत ठेवून तुम्हाला देणे. पुढे तो हे सुद्धा म्हणाला की, मीच ते कडे तुम्हाला देणार होतो. पण मला अचानक यावे लागले.
रामा - भटजी बुवा, ती सर्वच तयारी केली आहे. काळजी करू नका.
भटजी - अरे रामा.. पण तूला हे सारे मी निरोप न सांगताच कसे कळाले होते ??
रामा - भटजी बुवा, माझे बाबा तुमच्या स्वप्नात आले नि तुम्हाला निरोप सांगितला. तो ऐकून तुम्ही उठून बाहेर पडले. बाबांना नंतर दुसरा एक निरोप आठवला. पण तुम्ही झोपलेच नाही. म्हणून बाबा सकाळीच माझ्या आईच्या स्वप्नात आले होते. त्यांनीच हा निरोप आईला दिला होता. म्हणून आम्ही सर्व तयारी करून ठेवली आहे.
भटजी - अरे वाहव्वा रामा. छान झाले आहे. पण तो दुसरा निरोप काय होता ?? ते मलाही सांगावे.
रामा - होय भटजी बुवा. तो निरोप तुमच्यासाठीच आहे. तरी कृपया जरा आतील खोलीत चालावे. म्हणजे सर्व निरोप सांगून बाबांनी सांगितले ते कामही आतच उरकून घेऊ.
भटजी - अरे.. चला आत. तू म्हणतोस तसेच करू.
(रामा, भटजींना घेऊन आतल्या खोलीत जातो. तेथे भटजीला अंगावरील कपडे काढायला सांगतो. पूजेसाठी सोवळे नेसू असे बोलतो. भटजीला उघड्या अंगाने एका ओट्यावर आडवे लेटायला सांगतो. धरून ठेवतो. तोच एक गडी दोन्ही हातात लालबुंद तापलेल्या लोखंडी सळई घेऊन जवळ येतो.)
भटजी - अरे रामा.. हे काय चालले आहे ? हा कोण आहे ?
रामा - भटजी बुवा, माझ्या बाबांनी मला दिलेला निरोप पूर्ण करत आहे. बाबा म्हणाले की, मी घाईघाईत निघून आलो. पण नेमके त्याचवेळी माझ्या ढुंगणावर गरम सळीचे चटके देणे राहून गेले. काल रात्री मला खूप त्रास झाला. आपले भटजी बुवा तुझ्या घरी पूजेला येतील तेव्हा त्यांना पाच तोळे सोन्याचे कडे दे. पण अगोदर माझ्या ढुंगणावर गरम चटके देण्याचे राहून गेले होते. तेंव्हा ते चटके भटजी बुवा यांच्या ढुंगणावर दे. म्हणजे माझेही दुखणे कमी होईल. तेंव्हा भटजी बुवा, मी बाबांचा निरोप पूर्ण करण्यासाठी तुम्हाला येथे आडवे केले आहे. थोडावेळ कळ सहन करा. अगदीच एका मिनिटात दोन्ही डागण्या देऊन होतील.
हे ऐकताच भटजी बुवा हादरला. रडपड करत बसला. अरे रामा, मी खोटे बोललो असे सांगू लागला. पण रामाने त्याला दाबून धरले होते. तेवढ्यात रामाची आई आली. नि रामाला विचारले, अरे रामा बाळा, झालं की नाही बापाचे गरम चटके देण्याचे काम ??? हे ऐकताच भटजी आणखी थरथरत रडू लागला. रामाच्या आईकडे पाहत हात जोडून गयावया करू लागला. आई मला वाचवा. म्हणत लोळून पाय धरू लागला. तर गडी लालबुंद गरम लोखंडी सळई त्याच्या ढुंगणाजवळ नेत असे.
आई - भटजी बुवा, चला लवकर उरकून घ्या. आमच्या मालकांचा त्रास वाढत असेल.
थोडावेळ गेला. भटजी पूर्ण भानावर आला. अंगावरचे सर्व सोने रामाच्या हातात ठेवले व पाय धरुन माफी मागू लागला. रामाने त्या भटजी बुवास बसते केले. त्याला सांगितले भटजी बुवा, आमचे कुटुंब संभाजी ब्रिगेडचे शिवधर्मी कुटुंब आहे. तू पितरांना जेऊ घालायची गळ घातली व आठ दिवसांपूर्वी निरोप दिला होता की माझ्या बापाने स्वर्गातून पृथ्वीवर निरोप दिला होता. तुझे ढोंग उघडे पाडण्यासाठी आम्ही ही तयारी केली होती. असे म्हणत रामा व त्याच्यासोबत असलेल्या गड्याने भटजी च्या ढुंगणावर गरम गरम चटके दिले. नि त्याला विना कपड्यांचे हाकलून दिले. (तो भटजी वेडा होऊन बडबडत फिरत असतो.)
ताजा कलम - त्या भटजीने जवळपास दहा बारा गावात प्रसार केला आहे की, संभाजी ब्रिगेडच्या पोरांकडे पूजा करण्यासाठी भटजींनी जाऊ नये. लंगडणारा भटजी पाहून लोकांना शाहिस्तेखानाची आठवण येते.
आता सर्व गावकरी पितृपक्षात निधन झालेल्या व्यक्तीचे फोटो ठेऊन पुष्पमाला अर्पण करून दर्शन घेतात. नंतर तासभर त्या व्यक्तीचे जीवनातील आठवणी जाग्या करतात. तर ज्या मृत व्यक्तीच्या निधनाची अचूक तारीख माहीत आहे अशा घरात त्याच तारखेला स्मृतीदिन साजरा करतात. काही मुले-मुली आपल्या आई वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त मायबापाची आठवण चरित्रात मांडून प्रकाशित करतात.
मित्रांनो, शिवधर्मात मातृ-पितृ ऋण, मृत व्यक्ती बाबतीत आदरभाव व्यक्त करण्याची तरतूद केली आहे. भाकडकथा मान्य नाहीत. मृत व्यक्ती कधीही कोणत्याही रुपात पुन्हा जेवायला येत नाही. मृत व्यक्ती बाबतीत आदरभाव व्यक्त करणे यातच पितरपूजन आहे हे लक्षात घेऊन आपण आपल्या घरी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून, विवेक जागृत ठेवून असे भावनिक परंपरागत कौटुंबिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजेत हीच विनंती आहे.
टिप.- या नाटिकाचे प्रयोग करण्यासाठी आमच्या कोणत्याही परवानगीची गरज नाही. तसेच यात सोयीनुसार सकारात्मक वैज्ञानिक, वैचारिक, विवेकवादी बदल करण्याची परवानगी आहे.
धन्यवाद व सदिच्छा..
पुरुषोत्तम खेडेकर,
संस्थापक, मराठा सेवा संघ, चिखली.
0 Comments