Hot Posts

6/recent/ticker-posts

बहूजन समाजाची कार्टी



 बहूजन समाजाची कार्टी

धिंगाणा,मस्ती अन् पार्टी

महापुरुषांच्या जयंतीस ज्यांना

अभिवादनासाठी वेळ नसतो

ईतर दिवशी सणोत्सवाच्या

निमीत्ताने बँडसमोर लोळत बसतो


जातीयतेचं बीज कुणीतरी धर्माच्या

नावाखाली नुसतं पेरुन बघावं

अन् उच्चशिक्षीत बहूजनांनसुध्दा

जातीय दंगलीत पेटून उठावं


चिकित्सा,वाचन अन् विचार

तर आमच्या पाठ्यपुस्तकातच नाही

शिव-फुले-शाहू-आंबेडकरांसारखे

महापुरुष मस्तकातच येत नाहीत


वेळीच सावरलो आम्ही तर निदान

दाभोळकर-पानसरेंना जिवंत ठेवू

अधिकारी,डाँक्टर,इंजिनियर होऊन

आईवडिलांच्या स्वप्नांना पुर्णत्वास नेउ


शिवश्री सचिन जगताप

९६९६९६९५५८

९८९००४७५५८

Reactions

Post a Comment

0 Comments