नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनासमोर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 4, 2025

नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनासमोर

 नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनासमोर


सोलापूर (कटुसत्य वृत्त):- सोलापूर महानगपालिकेच्या वतीने सोलापूर शहरातील नागरिकांच्या समस्यांचे तातडीने आणि प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी महानगरपालिकेने जनता दरबार अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. झोन कार्यालयात प्रत्येक बुधवारी दुपारी १२ ते २ या वेळेत हा दरबार होणार आहे. यासाठी खास नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली आहे.


विभागीय कार्यालयातील जनता दरबारमध्ये नियुक्त नियंत्रण अधिकारी उपस्थित राहत जनतेच्या समस्या जाणून घेत त्या तक्रारीच्या निपटारा करणार आहेत. जनता दरबार उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांना प्रशासनाशी थेट संवाद साधणे, शहरातील समस्या मांडण्याची संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्यावर जलदगतीने उपाययोजना करणे हा आहे. यामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख होऊन नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल. या नव्या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडवता येतील असा विश्वास महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांचा आहे. तरी नागरिकांनी या जनता दरबार मध्ये सहभागी होऊन आपल्या समस्या मांडण्याचे अवाहन महापालिका आयुक्तांच्या वतीने करण्यात आले.


चौकट 

झोननिहाय जनता दरबार व नियंत्रण अधिकारी

■ झोन १ : उपायुक्त तैमूर मुलाणी (पहिला व तिसरा बुधवार )

■ झोन २ : उपायुक्त किरणकुमार मोरे (पहिला व तिसरा बुधवार )

■ झोन ३ : उपायुक्त आशिष लोकरे (पहिला बुधवार)

■  झोन ४ : उपायुक्त आशिष लोकरे (दुसरा बुधवार)

■ झोन ५ : उपायुक्त किरण मोरे (दुसरा व चौथा बुधवार)

■ झोन ६ : उपायुक्त आशिष लोकरे (तिसरा बुधवार)

■ झोन ७ : अतिरिक्त आयुक्त रवि पवार (पहिला व तिसरा बुधवार)

■ झोन ८ : उपायुक्त तैमूर मुलाणी (दुसरा व चौथा बुधवार)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages