प्रवेश नोंदणीसाठी पुन्हा तांत्रिक अडचणी
सोलापूर (कटुसत्य वृत्त):- अकरावी प्रवेशासाठी दोन दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. मात्र, ऑनलाईन प्रवेश नोंदणी करता पुन्हा तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.
प्रवेश नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन केंद्रावर गेल्यावर प्रवेशाची संकेतस्थळ ओपन न होणे, ओपन झाल्यास संथगतीने चालणे, चलन भरण्यास अर्धा तास लागले, अचानक सर्व्हर डाऊन होणे, अशा अनेक अडचणी येत असल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांची नोंदणी मंगळवारी झाली नाही. त्यामुळे ते विद्यार्थी पुन्हा
बुधवारी ऑनलाईन नोंदणी करणार आहेत.
दरम्यान, सोमवार, दि. २६ मे पासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवारी दि.३..जूनला प्रवेशाची मुदत संपणार होती. मात्र, राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची नोंदणी बाकी असल्याने गुरुवार दि. ५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्रवेशासाठी दोन दिवसच शिल्लक राहिल्याने विद्यार्थी अर्ज नोंदणीसाठी
विविध महा-ई-सेवा केंद्रावर गर्दी केल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.
चौकट
दोन दिवसांत करावे लागणार अर्ज
अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू आहेत. जिल्ह्यात ५९ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील जवळपास ४० हजार विद्यार्थ्यांने ऑनलाईन नोंदणी केली आहे. उर्वरित १९ हजार विद्यार्थ्यांना दोन दिवसात ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे, अन्यथा त्यांना अकरावीसाठी प्रवेश मिळणार नाही.
0 Comments