कायद्याच्या चौकटीत सण साजरा करा : आयुक्त - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 4, 2025

कायद्याच्या चौकटीत सण साजरा करा : आयुक्त

 कायद्याच्या चौकटीत सण साजरा करा : आयुक्त


सोलापूर (कटुसत्य वृत्त):- कायद्याच्या चौकटीत राहूनच प्रत्येकांनी सण उत्सव साजरा केला पाहिजे, असे मत पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी व्यक्त केले.


बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयात आयोजित शांतता बैठकीत बोलत होते. यावेळी पोलिस अधिकारी, शांतता समितीचे सदस्य, महापालिकेचे अधिकारी, शहर काझी, मुस्लिम धर्मगुरू, प्रमुख मस्जिदचे विश्वस्त, प्रमुख ईदगाह मैदानाचे विश्वस्त यावेळी उपस्थित होते.


यावेळी आयुक्त एम. राजकुमार यांच्यासह अजित बोऱ्हाडे, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, पोलिस उपायुक्त प्रताप पोमण, सहाय्यक पोलिस आयुक्त यशवंत गवारी, सुधीर खिरडकर, राजन माने, पालिकेचे किशोर सातपुते, महावितरणचे अति कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे, व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त विशाल येवलेसह सर्व पोलिस ठाणेतील प्रभारी अधिकारी व पोलिस अंमलदार, व शांतता कमिटीचे सदस्यांची उपस्थिती होती.


आयुक्त राजकुमार म्हणाले की, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणीही व कोणत्याही प्रकारचे गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे वाहतूक करू नये, याची नोंद घ्यावी. बकरीच्या कुर्बानीनंतर सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, उघड्यावर कोणतीही घाण, रक्त किंवा मांस पडणार नाही याची काळजी प्रत्येकांनी घ्यावी. स्वच्छतेचे पालन करत रोगराई, दुर्गंधी पसरणार नाही याची दक्षता घ्यावी. कायद्याचे उल्लंघन करू नये. प्रारंभी उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांनी प्रास्ताविक केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages