शिवराज्याभिषेक सोहळ्यास मोहोळ तालुक्यातून हजारो शिवभक्त जाणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 4, 2025

शिवराज्याभिषेक सोहळ्यास मोहोळ तालुक्यातून हजारो शिवभक्त जाणार

 शिवराज्याभिषेक सोहळ्यास मोहोळ तालुक्यातून हजारो शिवभक्त जाणार


नरखेड (कटुसत्य वृत्त):- युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीच्यावतीने किल्ले रायगडावर ५ व ६ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या 'शिवराज्याभिषेक सोहळा जागर शौर्यभक्तीचा' या उत्सवाला मोहोळ शहर व तालुक्यातून हजारो शिवभक्त जाणार असल्याची माहिती शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे शुभम ढवण यांनी दिली.


किल्ले रायगड येथे प्रत्येक वर्षाप्रमाणेच यावर्षी पाच व सहा जून रोजी मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. ५ जून रोजी दुपारी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीला अभिवादन करून शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर युवराज छत्रपती संभाजी महाराज व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांचे किल्ले रायगड येथे भव्य स्वागत व शिवभक्तांच्या समवेत पायी गड चढण्यास प्रारंभ होणार आहे. त्यानंतर नगरखाना येथे गड पूजन होणार असून त्यानंतर

संयोगिता राजे छत्रपती महाराजांच्या हस्ते 'धार तलवारीची युद्ध कला महाराष्ट्राची' या युद्ध कलेच्या प्रात्यक्षिकाला प्रारंभ होणार आहे. दि. ६ जून रोजी रायगडावर युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पारंपारिक वाद्याच्या गजरात ध्वज पूजन व ध्वजारोहण कार्यक्रम होईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे राज सदरेवर आगमन, सिंहासनारुड मूर्तीला सुवर्णमुद्रांचा अभिषेक केला जाणार आहे.


तरी शिवभक्तांनी रायगडावर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या मोहोळ शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी समर्थ काळे, विजयराज करंडे, देविदास भोसले, रामभाऊ गुंड, बबलू पासले, गोपाळ देशमुख, श्रीकांत ढवण, विजय रणपिसे, अमोल

करंडे, ब्रह्मदेव करंडे, रोहन देशमुख, नितीन वाघमारे यांच्यासह आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages