शहर अध्यक्ष पदाचा कार्यकाल स्वामी चरणांना समर्पित : तडवळकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 4, 2025

शहर अध्यक्ष पदाचा कार्यकाल स्वामी चरणांना समर्पित : तडवळकर

 शहर अध्यक्ष पदाचा कार्यकाल स्वामी चरणांना समर्पित : तडवळकर



अक्कलकोट (कटुसत्य वृत्त):- मला लाभलेले भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष पद व त्याचा कार्यकाल हा स्वामी चरणांना समर्पित असल्याचे मनोगत येथील श्री. वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरातील स्वामी दर्शनानंतर भारतीय जनता पार्टीचे सोलापूर शहर अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांनी व्यक्त केले.


त्यांनी श्री. वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट सहकुटुंब भेट देवून स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी रोहिणी तडवळकर व रामभाऊ तडवळकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. यावेळी रोहिणीताई तडवळकर बोलत होत्या. तडवळकर यांनी अत्यंत कार्यसचोटी आत्मसात करून पक्षाने सोपवलेली

जबाबदारी अत्यंत तळमळीने पार पाडून जनतेची व कार्यकर्त्यांची सेवा करेन असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांचे परिपूर्ण विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेवढे पक्षासाठी योगदान देता येईल, तेवढे देणार असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी प्रथमेश इंगळे, भारतीय जनता पार्टीचे पंचायत राज व ग्रामविकास जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र वाघमोडे, श्रीशैल गवंडी, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीकांत मलवे, ऋषिकेश लोणारी, विपुल जाधव, सागर गोंडाळ व अन्य उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages