आशियाई कराटे पदकविजेती भुवनेश्वरीचा भव्य नागरी सत्कार सोहळा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 5, 2025

आशियाई कराटे पदकविजेती भुवनेश्वरीचा भव्य नागरी सत्कार सोहळा

 आशियाई कराटे पदकविजेती भुवनेश्वरीचा भव्य नागरी सत्कार सोहळा



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची मान्यता असलेल्या वर्ल्ड व आशियन कराटे फेडरेशन तर्फे ताश्कंद उझबेकीस्तान येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई कराटे स्पर्धेत ऐतिहासिक कास्य पदक जिंकलेल्या भुवनेश्वरी संगीता सुरेश जाधव हिचा भव्य नागरी सत्कार सोहळा पोलीस आयुक्त एम राजकुमार (भा.पो. से.) यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली व भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर,  रा.काँ. चे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या सन्माननीय उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळेस बोलताना पोलीस आयुक्तांनी भरभरुन प्रशंसा करत भुवनेश्वरीला एशियन गेम्स साठी शुभेच्छा दिल्या व सोलापूर विद्यापीठासह वैयक्तिक सर्व सहयोग देण्याची खात्री दिली.

क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांनी भुवनेश्वरीच्या क्रीडा कौशल्याचे कौतुक करत शासकीय नियमानुसार सर्व मदत करणार असल्याचे खात्रीपूर्वक सांगीतले.

या सन्मान सोहळ्यात भुवनेश्वरीचे बंधू ट्रेडिशनल व स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे सचिव मिहिर जाधव यांनी तिच्या गत पाच वर्षांच्या मेहनत, सराव व संघर्ष, दुखापत, शस्त्रक्रिया, रिहॅब, पुन्हा कौशल्य प्रशिक्षण अशा खडतर साधनेच्या प्रवासाची तसेच आशियाई व जागतिक स्तरावरील कर्तृत्वाच्या क्षणचित्रांची तयार केलेली क्लीप दाखवण्यात आली.

संयोजन समिती तर्फे ओम भैय्या दरक यांनी स्वागत केले. आई संगीता सुरेश जाधव यांनी प्रास्ताविक करताना स्कूल व युनिव्हर्सिटी गेम्स, नॅशनल व एशियन गेम्स मधील कराटे ची सद्य स्थिती तसेच भविष्यातील संधींचाही उहापोह केला.

सिनेट सदस्य प्रा. सचिन गायकवाड यांनी विद्यापीठ स्तरावरील कराटेची अंतर्भूतता व भुवनेश्वरीच्या माध्यमातून विद्यापीठाच्या कराटे खेळाडूंना मिळणारी संधी या निमित्ताने व्यक्त केली.

भाजप क्रीडा प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष यशवंत पाथरुट यांनी समर्पक स्मृतिचिह्न प्रदान करुन भुवनेश्वरीचे अभिनंदन केले. क्रीडा भारतीचे पश्चिम महाराष्ट्र मंत्री ज्ञानेश्वर मॅकल यांनी सोहळ्याचा समन्वय साधला. यावेळेस संस्कृती प्रतिष्ठानच्या माया गांधी, चंदा पाटील, आशा ठकराल, क्रीडा शिक्षक संघटनेचे सुहास छंचुरे, उज्वल मलजी, पाटील, वसपटे तसेच गट शिक्षण अधिकारी जमादार आणि रुद्र चे आकाश झळकेनवरु, शिवलीला स्पोर्ट्सचे शिवशरण व स्वामी, ओकीनावाचे प्रभु,माजी उपक्रीडाधिकारी सत्येन जाधव,एस ई एस च्या नागणसुरे मॅडम यांच्या वतीनेही भुवनेश्वरीचा सत्कार करण्यात आला.

रुद्र अॅकॅडमीचे पालक प्रतिनिधी साईनाथ यादव यांनी आभार मानले. तर सहस्त्रार्जुन प्रशालेचे मोरेश्वर काटवे यांनी सुत्र संचालन केले. सोहळ्यात रुद्र अकादमी व नेहरु क्रीडांगणाचे खेळाडू, पालक, क्रीडा शिक्षक,  शिक्षण संस्था प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages