आदिनाथसमोर उदय देशमुखांचे उपोषण; लोकप्रतिनिधी आणि तालुक्यातील नेत्यांनी फिरवली पाठ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 11, 2026

आदिनाथसमोर उदय देशमुखांचे उपोषण; लोकप्रतिनिधी आणि तालुक्यातील नेत्यांनी फिरवली पाठ

 आदिनाथसमोर उदय देशमुखांचे उपोषण; लोकप्रतिनिधी आणि तालुक्यातील नेत्यांनी फिरवली पाठ





करमाळा (कटूसत्य वृत्त):- करमाळा तालुक्यातील महत्त्वाची व आर्थिक नाडी समजली जाणारी संस्था म्हणजे श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना होय. या कारखान्यासमोर गेली चार ते पाच दिवसापासून वांगी येथील युवा कार्यकर्ते सभासदाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहे. मात्र गेली पाच दिवस झाले या उपोषण स्थळी तालुक्यातील लोकप्रतिनिधी सहित इतर नावाजलेल्या प्रमुख नेत्यांनी या उपोषणाची कसलीही दखल घेतली नाही. याबाबत सभासद वर्गांमधून तीव्र नाराजी व संताप व्यक्त होत आहे. म्हणजेच तालुक्यातील नेत्यांनी सभासदाच्या हिताकरिता बसणाऱ्या या युवकाच्या उपोषण स्थळाकडे अक्षरशः पाठ फिरवली आहे.
करमाळा तालुक्याची जीवनदायीनी असणारा आदिनाथ सहकारी कारखाना भाडे कराराने किंवा सहयोगी तत्वावर चालू देण्याची प्रोसेस चालू आहे परंतू सदरची माहिती तालुक्यातील तेहतीस हजार सभासदांच्या मागणीसाठी म्हणून गेली चार दिवसापासून उदयसिंह देशमुख आमरण उपोषणास बसले आहेत. परंतू तालुक्यातील प्रमुख नेते सहित इतर नावाजलेल्या नेत्यांना याची काहीही सोयरसुतक नसल्यासारखी वागताना दिसतात. तालुक्यातील सर्व प्रमुख गटांनी या कारखान्यावर सत्ता उपभोगली आहे तसेच कारखाना अधोगतीला नेण्यासाठी सर्वांचा हातभारही लागला आहे. नेत्यांना कारखाना चालू करायचा नाही फक्त त्याचे भांडवल करून राजकारण करायचे आहे. आपल्याच पोळीवर डाळ कशी ओढता येईल हे बघायचं आहे पण कारखाना चालवून शेतकरी सभासद यांचे भले करायचे नाही हे सर्वांना कळून चुकलेलं आहे असे सभासद वर्ग मधून बोलले जात आहे.

*चौकट*
 तालुक्यातील "एक उमदा तरुण गेली चार दिवसापासून आपल्या जीवाची बाजी लावतोय" ते पण स्वार्थासाठी नाही पण यासाठी कोणी सपोर्ट सुद्धा करताना दिसत नाही यामध्ये या निमित्ताने मी आवाहन करतो की तालुक्यातील सभासदांनी या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देऊन तालुक्याच्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी प्रेरणा द्यावी
— विजय निकत, उंदरगाव आदिनाथ सभासद.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages