चेअरमन बाबुरावजी बोत्रे-पाटील यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाने साजरा
भाळवणी (कटूसत्य वृत्त) :- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखाना सहयोग ओंकार शुगर कार्पोरेशन प्रा.लि, चंद्रभागानगर,भाळवणी कारखाना कार्यस्थळावर ओंकार साखर कारखाना प्रा.लि, युनिट नं.1 ते 20 चे चेअरमन व अशोक नागरी सह.बँकेचे संस्थापक बाबुरावजी बोत्रे पाटीलसाहेब यांचा वाढदिवस विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवुन साजरा करण्यात आला.
कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यस्थळावरील वसंतराव काळे विद्यामंदिर प्रशालेतील विद्यार्थ्याचेहस्ते केक कापून बाबुरावजी बोत्रे-पाटीलसाहेब यांचा वाढदिवस आनंदाने साजरा करण्यात आला. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर आर.आर.साळुंखेसो, प्र.कार्यकारी संचालक पी.डी.घोगरेसो व सर्व अधिकारी यांचे शुभहस्ते शालेय साहित्य् व खाऊ वाटप करण्यात आले. कंपास, वह्या व खाऊ मिळाल्यामुळे सर्व चिमुकल्यां विद्यांर्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येत होता. तसेच वाढते औद्योगिकरण, वृक्षतोड, वाढते तापमान यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला असून, त्याचा आरोग्यावर व शेतीवर परिणाम होत असल्यामुळे कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपन करण्यात आले व सर्व कर्मचाऱ्यांना अल्पोपहार वाटप करण्यात आला. तसेच पंढरपूर येथील मुकबधीर व मतिमंद शाळेतील मुलांना शालेय साहित्य् व खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी जनरल मॅनेजर आर.आर.साळुंखेसो यांनी चेअरमन बाबुरावजी बोत्रे-पाटीलसाहेब यांच्या संघर्षमन जीवनाचे कार्य सांगुन अडचणीतील कारखान्यांना पुर्नजीवन देवुन कारखान्यातील लाखो कटुंबियांना आधार दिला असून, कारखाने सुस्थित पुर्ववत चालु केल्यामुळे कारखान्यावर आवलंबुन असणाऱ्या सर्वच घटकांना काम मिळाले याची दखल घेवुन साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी आणि तंत्रज्ञान विकासातील योगदानाबद्दल 'दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया)' च्या ७० व्या वार्षिक परिषदेत चेअरमन बाबुरावजी बोत्रे-पाटीलसाहेब यांना उत्कृष्ट साखर उद्योग गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेत, देशपातळीवर साखर उद्योगाला नवी दिशा दिल्याबद्दल व ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण केल्याबद्दल ओंकार शुगर ग्रुपला नवभारत विकसित पुरस्कार तसेच लोकशाही भारत लीडरशिप समिट अवॉर्ड देवुन विशेष गौरवण्यात आले असल्याचेही यावेळी जनरल मॅनेजर आर.आर.साळुंखे यांनी सांगितले.
सदर प्रसंगी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखाना सहयोग ओंकार शुगर कार्पोरेशन प्रा.लि, युनिट नं.14 चे प्र.कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे, एच.आर. मॅनेजर युवराज भंडारे, चिफ इंजिनिअर अजिनाथ बनकर, चिफ केमिस्ट मोहन पवार, चिफ अकौंटंट बबन सोनवले, विजय तंडे, डिस्टीलरी मॅनेजर अमोल आवताडे, मुख्य शेती अधिकारी दादासो देशमुख, इले.मॅनेजर दिलीप सुतार, इन्स्टुमेंट मॅनेजर दिपक सावंत, प्रशासकीय अधिकारी चांगदेव चव्हाण, इडीपी मॅनेजर सुनिल बारले, कामगार युनियनचे अध्यक्ष बंडु पवार, परचेस ऑफिसर चंद्रकांत कुंभार, निखिल कोठावळे, हेड टाईम किपर संतोष काळे, सिव्हिल सुपरवायझर शशिकांत सावंत, सुरक्षा अधिकारी बाबासो पिसे, इ.सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच वसंतराव काळे विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक संजय काळे, शिक्षक शिक्षिका,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

No comments:
Post a Comment