उजनीच्या डाव्या व उजव्या कालव्यास पाणी सोडणे व तिसंगी तलाव पुर्ण क्षमतेने भरावा - कल्याणराव काळे
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- खरीप हंगामा करिता उजनीच्या डाव्या व उजव्या कालव्यास पाणीसोडणेबाबत तसेच पंढरपूर तालुक्यातील तिसंगी तलाव पुर्ण क्षमतेने भरून मिळावा या मागणीचे निवेदन मेलद्वारे जिल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी यांना पाठवून समक्ष पंढरपूर येथील प्रांताधिकारी यांना भेटून कल्याणराव काळे यांनी दिले.
निवेदनात काळे यांनी पुणे जिल्यात झालेल्या दमदार पावसामुळे सोलापूर जिल्याची वरदायिनी उजनी धरण हे ४५% हून अधिक भरलेले आहे. सोलापूर जिल्यात आजपावेतो पाऊस न झाल्याने शेतातील उभे पिके पाण्याविना जळू व करपू लागलेले असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. डाव्या, उजव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या काही गावाच्या ग्रामपंचायतींना पाणी टंचाईची झळ भासत आहे. उजनी जलाशयातून खरीप हंगामाकरिता डाव्या व उजव्या कालव्यात पाणी सोडल्यास सद्यस्थितीतील पिकांना जीवदान मिळणार असून काही गावांचा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. लाखो वारकरी भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या वारकऱ्यांची पंढरपूर येथे आषाढी यात्रा कालावधीत गैरसोय होऊ नये यासाठी उजनीतून भिमानदीला (चंद्रभागेला) पाणी सोडण्यात यावे. तसेच पंढरपूर तालुक्यातील तिसंगी तलावात १०% जलसाठा शिल्लक असून या तलावाखाली तालुक्यातील १३ गावे ओलिताखाली येत आहेत. तालुक्यात पाऊस न पडल्याने या भागातील गावांना पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. शेतातील उभीपिके पाणी न मिळाल्याने जळू लागलेली आहेत. गावकऱ्यांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रचंड भेडसावत आहे. नुकत्याच निरा भाडघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस झाल्याने धरणे दुथडी भरून वाहत आहेत. धरणातील सदरचे पाणी कालव्यास सोडल्यास तालुक्यातील १३ गावाच्या पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न मिटणार असून आषाढी यात्रेसाठी विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी पाण्याची सोय होण्यास मदत होणार आहे.
यावेळी सहकार शिरोमणी कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर, संचालक मोहन नागटिळक, जयसिंह देशमुख, जोतिराम पोरे, यशवंत पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, शंकर कवडे राष्ट्रवादी कॉंगेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अनिल नागटिळक, माजी नगरसेवक शुकुर बागवान,नारायण शिंदे,अर्जुन जाधव, महादेव सूर्यवंशी, प्रतिभादेवी नागरी पतसंस्थेचे संचालक संजय पाटील,इब्राहिम मुजावर,रमेश नागणे, सोबत बजरंग देठे, आण्णा जाधव प्रकाश गायकवाड, भाऊ मोरे,तुकाराम झांबरे,बाळू शिंदे,अंकुश चव्हाण, बंडु पवार आदी उपस्थितीत होते--
%20(1).jpeg)
No comments:
Post a Comment