जनहीत शेतकरी संघटनेचा कुरुल येथे रस्ता रोको - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 4, 2026

जनहीत शेतकरी संघटनेचा कुरुल येथे रस्ता रोको

 जनहीत शेतकरी संघटनेचा कुरुल येथे रस्ता रोको

सिंगल फेज आणि आठ तास सुरळीत वीजपुरवठा करा




 कुरुल (कटूसत्य वृत्त):- शेतीपंपा साठी पूर्वी प्रमाणे सलग आठ तास वीज द्या, वाडी वस्तीवरील संध्याकाळी ६ ते रात्री १० पर्यंत बंद केलेला सिंगल फेज विजपुरवठा सुरु करा या आणि अन्य प्रमुख मागण्यासाठी जनहीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महावितरण च्या विरोधात कुरुल येथे मोहोळ मंद्रूप राष्ट्रीय महामार्ग चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता मनिषकुमार सूर्यवंशी यांनी भ्रमनध्वनीवर येत्या दि. १०जुलै रोजी मोहोळ तालुक्यातील वीज वितरण संदर्भात येणाऱ्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

जनहीत शेतकरी संघटनेचे कुरुल येथे महावितरण च्या विरोधात तासभर रस्ता रोको आंदोलन केले.

यावेळी महावितरणच्या कारभारा विरोधात घोषणा देण्यात आल्या. गेली चार महिने लोड शेडींग सुरु असून शेतकऱ्यांना आठ ऐवजी सहा आणि आता चार तास वीज मिळत आहे आणि सिंगल फेज पुरवठा ऐन संध्याकाळी सहा ते रात्री दहा बंद असतो.पाणी असूनही वीज नसल्याने पाणी देता येत नाही अशी हतबल अवस्था झाली आहे. ही व्यथा आणि वेदना प्रभाकर देशमुख यांनी अधीक्षक अभियंता सुनिल माने आणि कार्यकारी अभियंता सूर्यवंशी यांना फोन वरून सांगत जोपर्यंत ते स्वतः येऊन दखल घेत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचा पवित्रा घेतला. अखेर सहायक पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे यांनी हस्तक्षेप करत महावितरण च्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत स्वतंत्र बैठक लावून प्रश्न सोडवण्याचे महावितरण च्या अधिकाऱ्यांनी मान्य केल्यावर देशमुख यांनी वीज मंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलन मागे घेतले.

यावेळी महावितरण मोहोळचे उप कार्यकारी अभियंता जी. जी. पटवेगर, मोहोळ शहरचे अभियंता नागेश खडतरे, कुरुल उपविभागीय कार्यालयाचे उप कार्यकारी अभियंता अमर करंडे,

घोडेश्वर चे अभियंता प्रशांत गायकवाड, कामतीचे अभियंता राहुल पल्ले हे उपस्थित होते.

यावेळी जनहीत चे नाना मोरे, चंद्रकांत निकम, धनाजी माळी, नितीन मस्के, प्रमोद लांडे, नागनाथ जाधव, संजय कुलकर्णी, गुरुदेव पाटील, शिवाजी जाधव,आनंद पाटील, शरद गोरे,अब्दुल हमीद बागवान, गणेश चवरे, सुधीर जाधव, महेश जाधव,  सिद्राम तोडकर,प्रकाश गुरव, किसनदेव जाधव, बालाजी पाटील, विजय तळेकर, बाळू कोळेकर आदी शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कामतीचे सपोनि बसवेश्वर जकीकोरे,

पोलीस उप निरीक्षक उस्मान शेख, सहायक पोलीस उप निरीक्षक प्रमोद असादे आदींनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने महामार्गवरील वाहतूक सुरळीत सुरु ठेवल्याने आंदोलंनामुळे वाहतूक कोंडी झाली नाही.

चौकट : विद्युत पुरवठा म्हणजे शेतकऱ्यांच सलाइन आहे तेच बंद केल तर शेतकरी जगणार कसा?

चार महिन्यापासून लोड शेडींग आणि वस्ती वरील सिंगल फेज वीज बंद केली आहे ती पूर्ववत चालू करा, आठ वरून सहा आणि चार तासावर वीज आणली. दिवसा विजेचे आश्वासन हवेतच विरले निदान आठ तास वीज तर नीट द्या मुख्यमंत्री साहेब अन्यथा यापुढे आणखी उग्र आंदोलन करू असा इशारा शेवटी अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी यावेळी दिला .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages