सोलापूरचे नवे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड; कुंदन भोळेंची बदली
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्याच्या सहकार विभागाने राज्यातील 18 उपनिबंधक सहकारी संस्था वर्ग अ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांची बदली करण्यात आली असली तरी ते सोलापुरातच थांबणार आहेत. त्यांची नियुक्ती सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासक पदी करण्यात आली आहे.
भोळे यांच्या जागेवर नाशिक आदिवासी विभागाचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे. ते बार्शीचे असल्याचे बोलले जात आहे.
यासह सोलापूर शहर उपनिबंधक पदावर प्रगती बागल यांची नियुक्ती करण्यात आली असून बागल यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले इथे उपनिबंधक होत्या.
कुंदन भोळे हे 2016 साली सोलापूर शहर उपनिबंधक म्हणून आले होते, त्यानंतर 2019 साली त्यांची नियुक्ती जिल्हा उपनिबंधक पदावर झाली, सुमारे सहा वर्षाहून अधिक काळ त्यांनी सोलापूर जिल्ह्यात काढला आहे.
0 Comments