Hot Posts

6/recent/ticker-posts

⭕खळबळजनकः- मोहोळ पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस शिपाई स्वाती अंभुरे यांनी घेतला घरातच गळफास घटनेच कारण अस्पष्ट...

मोहोळ पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस शिपाई स्वाती अंभुरे यांनी घेतला घरातच गळफास घटनेच कारण अस्पष्ट...
माढा(कटूसत्य वृत्त):- सोलापूर ग्रामिण पोलिस दलातील महिला पोलिस शिपाई स्वाती दत्ताञय अंभुरे उर्फ स्वाती भगतसिंग घोगरे वय वर्षे ३५ रा.शिवाजीनगर माढा यांनी त्यांच्या राहत्या  घरी गळफास घेऊन आपली जिवनयाञा संपवली.गळफास का घेतला ?हे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.घटनेनंतर तात्काळ स्वाती यांना नातेवाईकांनी उपचाराकरीता मिञ प्रेम हाॕस्पिटल माढा येथे आणले असता वैद्यकीय अधिकारी मस्के यांनी स्वाती या उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केल्यानं नातेवाईकांत व पोलिस दलांत  एकच खळबळ उङाली. 
या बाबत माढा पोलिसांना मिळालेल्या MLC वरुन माढा पोलिस ठाण्यात अकस्मात नोंद असे दाखल करण्यात आले आहे.मयत स्वाती भगतसिंग घोगरे या मोहोळ पोलिस ठाण्यात नेमणूकीस होत्या.त्यांचे दोनच वर्षांपूर्वी लग्न झाले होते.गेल्या सहा महिन्यांपासून त्या प्रसुती रजेवर होत्या .त्यांना पाच महिन्याचा  मुलगा वेदांत देखील आहे.आत्महत्या का केली याबाबत सर्वांनाच प्रश्नचिन्ह पङले असून या घटनेबद्दल आता हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेचा पुढील तपास माढा पोलिसांकङून जलदगतीने केला जातोय.
Reactions

Post a Comment

0 Comments