अकलूज येथील डी फार्मसी कॉलेज मध्ये रक्तदान शिबिर संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 23, 2026

अकलूज येथील डी फार्मसी कॉलेज मध्ये रक्तदान शिबिर संपन्न

 अकलूज येथील डी फार्मसी कॉलेज मध्ये रक्तदान शिबिर संपन्न




अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज येथील डी फार्मसी कॉलेज मध्ये रक्तदान शिबिर संपन्न झाले. शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ फार्मसी (पदविका) ने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या 108 व्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान हि संकल्पना जाणून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील ब्लड सेंटर आणि कॉलेज ऑफ फार्मसी (पदविका), अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न झाले. सदर रक्तदान शिबिरामध्ये एकूण 51 जणांनी रक्तदान केले.

सदर शिबिरास महाविद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब देवडकर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी तसेच ब्लड बँकचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित गांधी आणि त्यांचे सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages