Hot Posts

6/recent/ticker-posts

कृषि तंत्रज्ञान महोत्सव अनुकरणीय: अप्पर जिल्हाधिकारी निराळी

 कृषि तंत्रज्ञान महोत्सव अनुकरणीय: अप्पर जिल्हाधिकारी निराळी





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कृषि तंत्रज्ञान महोत्सव अनुकरणीय शेतीला सुधारीत तंत्रज्ञानाची जोड आवश्यक आहे असे प्रतिपादन सोलापूर जिल्हयाचे अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी यांनी कृषि तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्घाअन करताना केले. शबरी कृषि प्रतिष्ठान सोलापूर संचलित कृषि विज्ञान केंद्र सोलापूर तर्फे आयोजित कृषि तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्घाटन दि.  22 जानेवारी, 2026 रोजी करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.  हा कार्यक्रम 22 व 23 जानेवारी रोजी आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शबरी कृषि प्रतिष्ठान, सोलापूरचे चेअरमन प्रदिप गायकवाड उपस्थित होते. या कार्यक्रमाला जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले, ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. जगताप, जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. अनिल तांबे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. विशाल येवले, व्याख्याते व फार्म लॅब एरंड ऍग्रो प्रा. कंपनी वाशीमचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संतोष चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला आयोजित शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. सुरूवातीला केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. ला. रा. तांबडे यांनी प्रत्यक्ष पिक प्रात्येक्षिकात लागवड करण्यात आलेल्या पिकांविषयी माहिती दिली. येथे 34 पिकांच्या 50 पेक्षा जास्त वाणांची लागवड करण्यात आली आहे.  यामध्ये चारा पिके, भाजीपाला, तृणधान्य, चिया सिड सारख्या वेगळ्या पोषण तृणधान्याची लागवड करण्यात आली आहे.

अध्यक्षीय मार्गदर्शनात बोलताना प्रदिप गायकवाड यांनी येथे प्रत्यक्ष पिके प्रदर्शित केल्यामध्ये आपणास जे योग्य वाटते ते तंत्रज्ञान आपल्या शेतावर शेतकरी बांधवानी आत्मसात करावे तरच हा कार्यक्रम सार्थकी लागला असे म्हणता येईल असे प्रतिपादन केले. डॉ. लालासाहेब तांबडे यांनी या महोत्सवामध्ये प्रामुख्याने शेतकरी बांधवाना जैविक निवीष्ठा घरच्या घरी तयार करण्यासाठी मोफत विरझण देत असल्याचे सांगीतले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी कृषि विज्ञान केंद्रामध्ये आयोजित पीक प्रात्यक्षिकाला भेट द्यावी असे प्रतिपादन केले. प्रमुख व्याख्याते व फार्म लॅब एरंड ऍग्रो. प्रा. कंपनी वाशीम चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संतोष चव्हाण यांनी शेतकरी बांधवानी आपल्याला लागणारी खते औषधे घरच्या घरी तयार करण्याचे सुत्र बांधावरची शेतीशाळा या संकल्पनेतून विषद केले. घरातील डाळींच्या पिठांचा, दही, ताक इत्यादींचा वापर करून उत्कृष्ठ पध्दतीचे खत तयार करता येते. अशा प्रकारची खते औषधे वाशीम जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात शेतकरी करत असल्याचे सांगितले. शेणखत, लेंडीखत, मळी हे जिवाणूंची खाद्ये आहेत ती जमिणीत विपूल प्रमाणात आवश्यक आहेत. डाळी पिठांचा उंडा करून तो आंबवला व पाट पाण्यातून किंवा ड्रीपमधुन 4 ते 5 वेळा दिल्यास शेतीमधील पिकांचे रोग, किडी, वाढ विषयी समस्या कमी करण्यामध्ये होतो असे प्रतिपादन केले.  यावेळी महिला शेतक-यांची संख्या अधिक होती. प्रगतशील महिला शेतक-यांचे सत्कार या वेळी करण्यात आले. तसेच कृषि तंत्र विद्यालयाचे विद्यार्थीही बहुसंख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments