Hot Posts

6/recent/ticker-posts

महावितरणाच्या बेजबाबदार कारभारा विरोधात राष्ट्रवादीकडून मुख्य अभियंत्यांना निवेदन

 महावितरणाच्या बेजबाबदार कारभारा विरोधात राष्ट्रवादीकडून मुख्य अभियंत्यांना निवेदन




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- गेल्या अनेक महिन्यांपासून नातेपुते शहरात महावितरणचा कारभार अत्यंत बेजबाबदार पद्धतीने सुरू आहे. 'लोकशाही' ऐवजी जणू काही 'अधिकारीशाही' सुरू आहे की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अक्षय भांड यांनी बारामती येथे विद्युत महावितरण  परिमंडळाचे  मुख्य अभियंता धर्मराज पेटकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन  नातेपुते शहरातील नागरिकांना विद्युत पुरवठ्याबाबत तसेच करण्यात येणाऱ्या कामाबाबत महावितरणाच्या बेजबाबदार कारभारा विरोधात निवेदन दिले.दिलेल्या निवेदनामध्ये म्हणण्यात आले आहे की,काही अधिकारी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून सामान्य नागरिकांना विनाकारण त्रास देत आहेत. कामासाठी टाळाटाळ करणे आणि नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणे अशा अधिकाऱ्यांची त्वरित चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. तसेच कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय वीज खंडित केली जाते. यामुळे व्यापारी, विद्यार्थी आणि घरगुती ग्राहकांचे मोठे नुकसान होत आहे.वीज वापर कमी असूनही अव्वाच्या सव्वा बिले देऊन ग्राहकांना वेठीस धरले जात आहे. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्थानिक स्तरावर कोणीही जबाबदारी घेत नाही.नवीन विद्युत कनेक्शन असो किंवा डीपीची नादुरुस्तीची कामे असो त्या कामांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.आज आम्ही सनदशीर मार्गाने निवेदन देऊन प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.  
यावेळी मुख्य अभियंता धर्मराज पेटकर यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याचे आश्वासन अक्षय भांड यांना दिले. परंतु जर येत्या काही दिवसांत परिस्थिती सुधारली नाही आणि नागरिकांची पिळवणूक थांबली नाही, तर महावितरणच्या कार्यालयावर 'नातेपुते स्टाईल'ने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अक्षय भांड यांनी दिला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments