अनाथ मुलांसोबत साजरा केला अजित दादा आणि तटकरे यांचा वाढदिवस - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 22, 2024

अनाथ मुलांसोबत साजरा केला अजित दादा आणि तटकरे यांचा वाढदिवस

अनाथ मुलांसोबत साजरा केला अजित दादा आणि तटकरे यांचा वाढदिवस

           सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खा सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व जनविश्वास सप्ताह अंतर्गत आज राष्ट्रवादी  काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष सुजित अवघडे,सरचिटणीस विनायक रायकर,सहसचिव सायन्ना हनुमनला यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत शांताई अनाथ आश्रम येथील अनाथ मुलांना नवीन कपडे व  स्नेहभोजनाचे आयोजन करून त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा वाढदिवस साजरा केला.

      स्नेहभोजना वेळी उपस्थित मुलांनी गुरू पौर्णिमेनिमित्त गुरू ब्रम्हा गुरू विष्णू गुरू देवो महेश्वरा ही प्रार्थना सादर केली त्यानंतर स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

      यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांनी उपाध्यक्ष सुजित अवघडे ,सरचिटणीस विनायक रायकर ,सहसचिव सायन्ना हनुमनला यांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

      हा यावेळी महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम, समन्वयक शशिकला कसप्टे यांच्यासह  बुद्धप्रकाश ननवरे,रोहित गायकवाड,चैतन्य तूपसुंदर ,रोहन गायकवाड कुडुर,पुरुषोत्तम बोडा, पोडू गेजी , सुनील कत्तलु,सुदर्शन वल्लकाती ,श्रीनिवास यादव , इंद्रा, यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages