Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी जनविश्वास सप्ताह अंतर्गत जिल्हास्तरीय निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

राष्ट्रवादी जनविश्वास सप्ताह अंतर्गत जिल्हास्तरीय निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

            सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खा सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व जनविश्वास सप्ताह अंतर्गत आज राष्ट्रवादी  काँग्रेस पार्टी सोलापूर शहर व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डीस्ट्रिक चेस असोसिएशन च्या मान्यतेने जिल्हास्तरीय निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन डॉ.निर्मलकुमार फडकुले सभागृहात करण्यात आले होते.
याचे उद्घाटन जिल्हा समन्वयक तथा आमदार यशवंत तात्या माने व खेळाडू प्रिशा भांगे यांनी बुद्धिबळ स्पर्धेत स्वतः सहभागी होऊन उद्घाटन केले.

            या स्पर्धेत एकूणच तब्बल ५० पारितोषकांचे आयोजन करण्यात आले आहे .यामध्ये ११ वर्षाखालील गटातील मुलांनी, ११ वर्षाखालील गटातील मुलींनी  ,७ वर्षाखालील गटातील मुलांनी ,७ वर्षाखालील गटातील मुलींनी सहभाग घेतला आहे.

            या स्पर्धेत वरिष्ठ गटातील चार खेळाडूंची जळगाव येथे २५ ते २८ दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.तर ११ वर्षाखालील मुलांच्या गटात दोन खेळाडूंची कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. आणि ७ वर्षाखालील दोन खेळाडूंची पालघर येथे ३ व ४ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

            या स्पर्धेच्या उद्घाटनानंतर जिल्हा समन्वयक तथा आमदार यशवंत तात्या माने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला.

            यावेळी जिल्हा समन्वयक आमदार यशवंत तात्या माने यांनी त्यांच्या भाषणात जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर व सोलापूर चेस यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डीस्ट्रिक चेस असोसिएशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विशेष कौतुक केले.

            आदरणीय अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त व जनविश्वास सप्ताह निमित्त जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून स्तुत्य असा उपक्रम हाती घेऊन गुणवंत खेळाडूंसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून एक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे.राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा  पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब हे नेहमी राज्यातील गुणवंत खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने विशेष प्रयत्न करत असतात तोच आदर्श जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांनी या स्पर्धांच्या माध्यमातून निर्माण केला आहे असे ही मनोगत जिल्हा समन्वयक आमदार यशवंत तात्या माने  यांनी यावेळी व्यक्त केले.

            स्पर्धा आयोजनासाठी सहकार्य केल्याबद्दल चेस संस्थेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू अतुल कुलकर्णी, विद्यापीठ खेळाडू  संतोष पाटील  वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे, रोहिणी तुम्मा,  प्रशांत पिसे, यश इंगळे, गणेश मस्कले यांचा आमदार यशवंत माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

            या स्पर्धेला खेळाडूंचा प्रचंड असा प्रतिसाद मिळताना दिसून येतोय. व स्पर्धकांच्या पालकांमध्ये ही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

            यावेळी व्यासपीठावर जिल्हा समन्वयक आमदार यशवंत तात्या माने, जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते आनंद मुस्तारे राजेश देशमुख अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अमीर शेख मध्ये विधानसभा अध्यक्ष अलमेराज आबादीराजे शहर उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज शेरला ओबीसी विभाग शहराध्यक्ष अनिल छत्रबंध तनवीर गुलजार मूव्हीज मुल्ला समदानी शामराव गांगर्डे मत्तीखाने बसवराज कोळी दशरथ शेंडगे  सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम शहर समन्वयक शशिकला कस्पटे शोभा गायकवाड प्रिया पवार कांचन पवार रुक्मिणी जाधव संगीता गायकवाड सरोजिनी जाधव आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments