ईद-ए-मिलाद निमित्त रक्तदान शिबिर 111 रक्तदात्यांनी केले रक्तदान; सनराईज क्लब चा उपक्रम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 29, 2026

ईद-ए-मिलाद निमित्त रक्तदान शिबिर 111 रक्तदात्यांनी केले रक्तदान; सनराईज क्लब चा उपक्रम

 ईद-ए-मिलाद निमित्त रक्तदान शिबिर 111 रक्तदात्यांनी केले रक्तदान; सनराईज क्लब चा उपक्रम

जुलूस मध्ये मिठाई आणि पाणी वाटप



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- ईद-ए-मिलाद म्हणजेच मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त मोहोळ शहरात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली यामध्ये सनराइज बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित सनराइज क्लबच्या वतीने नगरसेवक मुस्ताक शेख यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक चार मधील बांधकाम कामगार शेतकरी मजूर या सर्व नागरिकांसाठी वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. या शिबिर चा शुभारंभ महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या रक्तदान शिबिरात 111 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर 150 नागरिकांचे वैयक्तिक अपघात विमा करण्यात आला आहे.

ईद-ए-मिलाद निमित्त मोहोळ शहरातून मुस्लिम समाज बांधवांनी एक जुलुस रॅली काढून विविध समाज बांधवांना सणाच्या शुभेच्छा दिल्या. जुलूस रॅलीमध्ये केक मिठाई आणि पाणी बॉटल चे वाटप करण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी उपस्थित पोलिस निरीक्षक दीपक पाटील उपनगराध्यक्ष दत्तात्रय खवळे नगरसेवक प्रमोद बापू डोके, सुशील भैया क्षिरसागर, संतोष सुरवसे, एजाज तलफदार, शकील शेख, उद्योजक खाजाभाई शेख, राजू सुतार, रफिक हरणमारे, इत्यादी सह प्रभागातील नागरिक उपस्थित होते


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हुजेफ शेख, शाहीद शेख, साकीब आतार, कय्युम शेख, मोईन शेख, जावेद बागवान, अजीम तांबोळी, साकीब शेख, सोयब शेख, अबिद शेख,आयाज शेख, निजाम लोहार, सुफियान शिकलकर, हरिष शेख, आयन तांबोळी, ईशान तांबोळी, सत्तार शेख, इंजमाम शिकलकर, मोईन शेख, अमन हारनमारे, समीर शेख इत्यादी सह सनराईज क्लब च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. 



चौकट
ईद-ए-मिलाद निमित्त सनराइज क्लब परिवाराच्या वतीने अनावश्यक खर्च टाळून प्रभागातील नागरिकांसाठी वैयक्तिक अपघात विमा करण्याचा आमचा उद्देश होता त्या शिबिर मध्ये 150 लोकांनी सहभाग घेतला आणि रक्तदान हेच श्रेष्ठ दान आणि सद्यः स्थिति मध्ये असलेला अपुरा रक्तसाठा याचा विचार करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी १११ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत ही रक्तदान शिबिर यशस्वी केले. त्या सर्व विमाधारक आणि रक्तदात्यांचे खूप खूप आभार. 

 मुस्ताक शेख 
मा. नगरसेवक तथा
संस्थापक अध्यक्ष सनराईज क्लब

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages