सोलापूर शहरात तीन महिन्यांचे धान्य टप्प्याटप्प्याने होणार वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 5, 2025

सोलापूर शहरात तीन महिन्यांचे धान्य टप्प्याटप्प्याने होणार वाटप

 सोलापूर शहरात तीन महिन्यांचे धान्य टप्प्याटप्प्याने होणार वाटप

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पावसाळा तसेच महापूरसारख्या आपत्तीजनक परिस्थितीत आता राज्यात शिधापत्रिकेवरील तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र, दुकानदारांकडे तिन्ही महिन्यांचे धान्य साठवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने धान्य वाटप जून महिन्यातच परंतु ते टप्प्याटप्याने करण्याचे धोरण ठरविले असल्याचे सांगण्यात येते.


तब्बल तीन महिन्यांचे मोठ्या प्रमाणात येणारे धान्य साठवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याच दुकानदाराकडे पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे तीन महिन्यांचे धान्य दुकानदाराने एकत्र उचलणे आणि लाभार्थ्यांना एकत्रित तीन महिन्यांचे धान्य वितरण करणे हे अव्यवहार्य आहे, हे लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे.


सोलापूर जिल्ह्यात जवळपास सर्वच रेशन दुकानात जून महिन्याचे धान्य उपलब्ध झालेले आहे. अन्न सप्ताह दिनाचे औचित्य साधून पहिल्या पंधरवड्यात म्हणजेच सात ते पंधरा तारखेपर्यंत जून महिन्याचे धान्य वितरण केले जाईल. तसेच जुलै व ऑगस्टचे धान्य आवक होताच वीस तारखेच्या पुढे वाटप होईल.


चौकट  

३० जून अखेर वाटप अपेक्षित

सोलापूर शहरात सर्वच रेशन दुकानात जून महिन्याचे धान्य उपलब्ध आहे, मशीनवर ज्या महिन्याचा डाटा उपलब्ध आहे, त्याचप्रमाणे धान्य वाटप करावे, जुलै-ऑगस्ट महिन्याचे धान्य उपलब्ध होताच त्याचे वाटप करावे. एकंदरीत ३० जूनपर्यंत तीनही महिन्याचे धान्य वाटप होणे अपेक्षित आहे. नितीन पेंटर, जिल्हा संपर्कप्रमुख, रेशन दुकानदार संघटना

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages