म्हैसाळच्या लाभ क्षेत्रातील शेतीच्या पाण्याचे प्रश्न मार्गी लावू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 5, 2025

म्हैसाळच्या लाभ क्षेत्रातील शेतीच्या पाण्याचे प्रश्न मार्गी लावू

 म्हैसाळच्या लाभ क्षेत्रातील शेतीच्या पाण्याचे प्रश्न मार्गी लावू



मुंबई (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्र्हयातील मंगळवेढा तालुक्यातील 8 गावांसाठी सिंचनासाठी 774 हे क्षेत्र मंजूर असून उर्वरीत 2000 ते 3000 हे लागवडीलायक क्षेत्र वंचित आहे. सदर सिंचन क्षेत्रामध्ये वाढ करून पाण्याची वाढीव तरतुद करण्यात यावी. उमदी वितरीकेवरील मंगळवेढा तालुक्यातील मौजे सलगरे (ब्रु.), सलगरे (खुर्द), आसबेवाडी, लवंगी, शिवंगी, येळगी, सोड्डी व हुलजंती या 8 गावांसाठी म्हैसाळ योजनेअंतर्गत उमदी वितरीकेतून येथून थेट स्वतंत्र बंदिस्त नलिकेव्दारे सिंचनासाठी पाणी देण्याच्या प्रस्तावास मंजूरी मिळण्याकरीता ग्रामस्थांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. याकरीता सोलापूर जिल्हयातील मंगळवेढा तालुक्यातील 8 गावांच्या सिंचनासाठी म्हैसाळ योजनेअंतर्गत उमदी वितरीकेवरील 774 हेक्टर मंजूर असून ते क्षेत्र वाढवून 5000 हेक्टर करून पाण्याची वाढीव तरतुद करून थेट स्वतंत्र बंदिस्त नलिकेव्दारे सिंचनासाठी पाणी देण्याच्या प्रस्तावास मंजूरी देऊन निधीची तरतुद करण्यात यावी.

सोलापूर जिल्र्हयातील मंगळवेढा तालुक्यातील मौजे मारोळी, शिरणांदगी, पडुळकरवाडी व लवंगी या तलावामध्ये पुरेसे पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांना, जनावरांना व पिकांकरीता पाण्याची अडचणी निर्माण होत आहे. याकरीता मंगळवेढा तालुक्यामधील मौजे मारोळी, शिरणांदगी, पडुळकरवाडी व लवंगी येथील तलाव म्हैसाळ योजनेअंतर्गत टॅंक फिडिंग बंदिस्त नलिकेद्वारे भरण्याकरीता ग्रामस्थांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. याबाबतचा टँक फिडिंग बंदीस्त नलीकेव्दारे पाणी भरण्याचा प्रस्ताव मंजूरीकरीता कार्यकारी संचालक, कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्रयातील मंगळवेढा तालुक्यामधील मौजे मारोळी, शिरणांदगी, पडुळकरवाडी व लवंगी येथील तलाव म्हैसाळ योजनेअंतर्गत टॅंक फिडिंग बंदिस्त नलिकेद्वारे भरण्याच्या प्रस्तावास मंजूर देवून त्याकरीता निधी उपलब्ध करून देण्यात यावे.

म्हैसाळ योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील गावांच्या सिंचनासाठी असलेल्या मंगळवेढा वितरीका क्रमांक 2 वरून मौजे महमदाबाद, शिरनांदगी, मारोळी, चिखलगी, जंगलगी, सलगरे (बु.), सलगरे (खुर्द), बावची व पौट या 9 गावांच्या सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतू या मंगळवेढा वितरीका क्रमांक 2 वरील स्टेज 5 पंप हाऊसमधील विद्युत पंपाची पाणी उपसण्याची क्षमता कमी झालेली आहे. त्यामुळे या 9 गावांसाठी पुरेश्या क्षमतेने पाण्याचा विसर्ग होत नाही. त्याचा परिणाम या गावातील सिंचन क्षेत्रावर झालेला आहे. त्यामुळे मंगळवेढा वितरीका क्रमांक 2 वरील स्टेज 5 पंप हाऊसमधील विद्युत पंपाची तात्काळ दुरुस्ती होणे गरजेचे असल्याबाबत या गावातील ग्रामस्थांनी खासदार प्रणिती शिंदे यांना निवेदन दिलेले होते. याकरीता म्हैसाळ योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील गावांच्या सिंचनासाठी असलेल्या मंगळवेढा वितरीका क्रमांक 2 वरील स्टेज 5 पंप हाऊसमधील विद्युत पंपाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मौजे मानेवाडी या गावातील तलाव पूर्ण क्षमतेने भरत नाही. यामुळे यामुळे शेतकऱ्यांना, जनावरांना व पिकांकरीता पाण्याची अडचणी निर्माण होत आहे. या गावाच्या आसपासचे हुन्नूर, ममदाबाद, रेवेवाडी या गावांचा समावेश म्हैसाळ योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे. याकरीता म्हैशाळ योजनेअंतर्गत मौजे मानेवाडी या गावाचा समावेश करण्यात यावा.

      सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मौजे शिरशी या गावांमध्ये पाण्याची पुरेशी क्षमता नसल्यामुळे शेतकऱ्यांना, जनावरांना व पिकांकरीता पाण्याची अडचणी निर्माण होत आहे.  मौजे शिरशी हे गाव मंगळवेढा मधील दुष्काळी पट्ट्यातील असून मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्षेत्रात येत असून त्याच्या आसपासची लक्ष्मीदहिवडी, आंधळगाव, लेंडवे चिंचाळे व गोणेवाडी ही गावे उपसा सिंचन योजनेमध्ये समाविष्ट असून शिरसी या गावाचे सदर योजनेमध्ये समाविष्ट होणे आवश्यक आहे. यासाठी मौजे शिरसी या गावाचे मंगळवेढा उपसा सिंचन योजनेमध्ये समावेश करण्यात यावा

हाल होत असल्याने सदरच्या प्रस्तावास तात्काळ मंजूरी मिळण्याकरीता ग्रामस्थांनी खासदार प्रणिती शिंदे यांना निवेदन दिलेले आहे. याकरीता म्हैसाळ मुख्य वित्रीकेपासून मौजे सलगर येथील लक्ष्मी तलाव व लवंगी येथील तलाव भरण्यासाठी प्रस्ताव मंजूर असून सदर प्रस्ताव निधीच्या अभावी शासन स्तरावर रखडलेला असल्याने सदरच्या प्रस्तावास तात्काळ मंजूरी मिळावी. इ. विषयांच्या समस्यांबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे शिष्टमंडळासमेवत भेट घेवून वरील समस्यांचे निवारण होण्याकरीता निवेदनाव्दारे मागणी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages