निराळे वस्ती येथील शिवमंदिरचे लोकार्पण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 5, 2025

निराळे वस्ती येथील शिवमंदिरचे लोकार्पण

 निराळे वस्ती येथील शिवमंदिरचे लोकार्पण



सोलापूर / (कटुसत्य वृत्त):- तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या प्रयत्नातून आणि उपजिल्हा प्रमुख तुकाराम मस्के यांच्या मागणीनुसार निराळे वस्ती उभारण्यात आलेल्या शिवमंदिराचे लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक याप्रसंगी बोलताना म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्व मंत्री शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, कोणतीही अडचण आल्यास तात्काळ संपर्क साधावा. जुने ज्येष्ठ शिवसैनिक नाना मस्के यांचे स्वप्न पूर्ण झाले यात आनंद आहे.

नाना मस्के म्हणाले, मागील २५ वर्षांपासून निराळे वस्तीतील नागरिक शिव मंदिराची मागणी करत होते. परंतु ते पूर्ण होत नव्हते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात निधी मंजूर झाला होता. जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी कामास सुरुवात केली. यानिमित्ताने आमचे स्वप्न पूर्ण झाले. यावेळी ज्ञानेश्वर शिंदे, अजय माने, अजय मस्के, नागा मंडलिक, लखन पवार, मनोज भांगे, गणेश कोरे, अविनाश हात्तरगी, सिध्दू कोरे, सिध्दाराम ढोबळे, जय मस्के, सचिन सुरवसे यांच्यासह जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages