Hot Posts

6/recent/ticker-posts

पाकवरील हल्ल्याचा शिवसेना ठाकरे पक्षाकडून जल्लोष

 पाकवरील हल्ल्याचा शिवसेना ठाकरे पक्षाकडून जल्लोष



सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदू पर्यटकांना गोळ्या घातलेल्या घटनेचा पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करून दहशतवाद्यांचा खात्मा केल्याबद्दल भारतीय सेनेचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब पक्षाच्यावतीने मंगळवार पेठ पोलीस चौकी येथे बुधवारी जल्लोष करण्यात आला.

याप्रसंगी 'जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, सूनले बेटा पाकिस्तान बाप है तेरा हिंदुस्थान, दूध मांगो खीर देंगे कश्मीर मांगो चीर देंगे, भारत माता की जय, वंदे मातरम, 'जय श्रीराम' अशा घोषणा देण्यात आल्या.

याप्रसंगी पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर, पाकिस्तानी झेंडा, अतिरेक्यांचे फोटो रस्त्यावर टाकून त्यांना जोडे मारण्यात आले. यावेळी पक्षाचे शहरप्रमुख महेश धाराशिवकर, जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण, शहर समन्वयक संताजी भोळे, लहू गायकवाड, विजय पुकाळे, संदीप बेळमकर, सोमशंकर कंठीमठ, सूरज रेवणकर, दिगंबर पालनकर, अनिल बिराजदार, नागराज कंदकुर, हृषीकेश धाराशिवकर, योगेश कंठीमठ, राजेश हेबळे, गिरीश शहाणे, राहुल वांगी, अमेय कळसकर, मनोज कामेगावकर, पिंटू कानेगावकर, धनंजय तपासे, संतोष पोतदार आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments