महात्मा गांधी प्राणी संग्रहालय सुधारण्यासाठी एनटीपीसी सहकार्य करणार
सोलापूर/(कटुसत्य वृत्त):- एनटीपीसीचे महाप्रबंधक बी. जे. सी. शास्त्री यांनी बुधवारी महापालिकेच्या विजापूर रोडवरील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयास भेट देऊन पाहणी केली. यावेळी एनटीपीसीच्या सीएसआर फंडातून महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाच्या सुधारणांसाठी सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले.
महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी एनटीपीसी थर्मल प्लांटला भेट दिली होती. त्यावेळी देगाव येथील ७५ एमएलडी मलनिस्सारण केंद्र व महात्मा गांधी प्राणी संग्रहालय येथे सीएसआर फंडातून मदत करण्यासंदर्भात चर्चा करून महापालिकेच्या वतीने पत्रही दिले होते. त्या अनुषंगाने एनटीपीसीचे महाप्रबंधक बी. जे. सी. शास्त्री, कार्यकारी संचालक व इतर अधिकाऱ्यांनी महात्मा गांधी प्राणी संग्रहालयास भेट दिली. यावेळी डॉ. सतीश चौगुले यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली.
यावेळी एनटीपीसीचे मनोरंजन सारंगी, रफिक उल इस्लाम, अमित सिंग, महापालिकेचे सहायक आयुक्त गिरीष पंडित, नगर अभियंता सारिका अकुलवार, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी आदी उपस्थित होते. शास्त्री यांनी महापालिका येथे आयुक्त डॉ. ओम्बासे याची भेट घेतली. यावेळी महात्मा गांधी प्राणी संग्रहालय येथे एनटीपीसीच्या सीएसआर फंडातून सहकार्य करू, अशी माहिती दिली.
0 Comments