Hot Posts

6/recent/ticker-posts

थोरला मंगळवेढा तालमीच्या शिवभोजन उपक्रमात २५ हजार शिवभक्तांना भोजन

थोरला मंगळवेढा तालमीच्या शिवभोजन उपक्रमात २५ हजार शिवभक्तांना भोजन 



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- थोरला मंगळवेढा तालमीच्यावतीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे आणि संकेतभाऊ पिसे यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुका पाहण्यासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या २५ हजार शिवभक्तांसाठी शिवभोजनाचे  आयोजन करण्यात आले होते. पोलीस आयुक्त एम. राजकुमार, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, पोलीस उपायुक्त गौर हसन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून आणि शिवरायांची आरती करून शिवभोजन उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.गेल्या सात वर्षापासून हा शिवभोजन उपक्रम सुरू आहे.
सोलापूरच्या डॉल्बी बंदिवरून पोलीस आयुक्त राजकुमार आणि राजाभाऊ सरवदे यांच्यात जुगलबंदी रंगली. आता राजाभाऊ सरवदे यांनी डॉल्बी बंदीची धुरा सांभाळावी असे, राजकुमार म्हणताच एकच हशा पिकला. तर न्यायालयाचा आदर ठेऊन मिरवणूक काढू अशी ग्वाही, राजाभाऊ सरवदे यांनी यावेळी सर्वांसमक्ष दिली.
   यावेळी नगरसेवक चेतन नरोटे,अनंत जाधव,गौतम कसबे,नगरसेविका सौ. मनोरमा सपाटे, महापालिका उपायुक्त विना पवार,जन्म्येयराजे भोसले,अमोलराजे भोसले,शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजाभाऊ सरवदे, संकेत पिसे, समीर लोंढे, राम गायकवाड,सागर पिसे,प्रताप चव्हाण, ज्ञानेश्वर सपाटे, सुरेश फलमारी, विजय पुकाळे, राजन जाधव, हरिभाऊ जाधव, जितेश कुलकर्णी, मनसेचे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर,संतोष बडवे, रवी मोहिते,आदी मान्यवर उपस्थित होते.
=================
काय म्हणाले, नेते...
 डॉल्बीला फाटा,
पारंपारिक वाद्याला प्राधान्य : 
================
सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी डॉल्बी बंद करून पारंपारिक पद्धतीने मिरवणुका सुरू केल्या असून हाच पायंडा कायम राहणार असल्याने सोलापूरचे चित्र भविष्यात चित्र बदलून जाणार असल्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी सांगितले.
डॉल्बी बंद केल्याबद्धल नगरसेवक चेतन नरोटे यांनीसुद्धा आभार मानले. राजाभाऊ सरवदे म्हणाले सोलापुरात २७५ दिवस जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रम होतात.सोलापूरला एकेकाळी दंगलीचे शहर म्हणून ओळखले जायचे,आज मात्र सोलापूर शांततेचे शहर म्हणून ओळखले जात आहे.सर्वांनी एकोपा केल्याने हे शक्य झाले आहेत.डॉल्बीला फाटा देऊन शिवभोजनाचा उपक्रम स्थूत्य असल्याचे सरवदे म्हणाले. पोलीस आयुक्त राजकुमार म्हणाले, लोकसहभाग असेल तर काहीही शक्य होऊ शकते, हे आपण सोलापुरातून शिकलो आहोत. डॉल्बी बंदीचे सर्व क्रेडिट सोलापूरकर जनतेचे आहे. सोलापुरातील सर्व जनतेची नजर राजाभाऊ सरवदे यांच्याकडे आहे, असे राजकुमार म्हणताच एकच हशा पिकला. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेऊ असे सरवदे म्हणाले.
===================
अखेरच्या क्षणापर्यंत
 उपक्रम सुरू राहणार 
===================
५ हजार शिवभक्तांच्या शिवभोजनापासून सुरू झालेला उपक्रम आज २५ हजार शिवभक्तांच्या शिवभोजनापर्यंत पोहोचला आहे. राजकारणात असेन नसेन पण अखेरच्या क्षणापर्यंत हा शिवभोजन उपक्रम सुरू राहील,अशी ग्वाही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे यांनी दिली.
राजकारण व निवडणुका संपल्या असून आता यापुढे सोलापूरच्या विकासासाठी आपण एकत्र येऊन जोमाने कामाला लावूयात असेही ते म्हणाले.

Reactions

Post a Comment

0 Comments