लायन्स क्लब पंढरपूर अध्यक्षपदी सी ए अतुल कौलवार. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 4, 2026

लायन्स क्लब पंढरपूर अध्यक्षपदी सी ए अतुल कौलवार.

 लायन्स क्लब पंढरपूर अध्यक्षपदी सी ए अतुल कौलवार.




पंढरपूर: (कटूसत्य वृत्त): लायन्स क्लब ऑफ पंढरपूरचा लायन वर्ष २०२६–२७ च्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा, नवीन सभासदांचा शपथविधी समारंभ कर्मयोगी सभागृह, पंढरपूर अर्बन बॅंक, खवा बाजार, पंढरपूर येथे अत्यंत दिमाखदार व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवातीला दीपप्रज्वलन, माही गुप्ता हिचे नृत्य, शैलजा कौलवार व लायन डॉ सुनिता कारंडे यांचे गायन झाले.
त्यानंतर माजी पदाधिकाऱ्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांकडे पदभार सुपूर्द केला. उपप्रांतपाल-२ लायन मंगेश दोशी (पिएमजेएफ) यांनी नूतन अध्यक्ष लायन C.A. अतुल कौलवार, सचिव लायन डॉ विवेक गुंडेवार, खजिनदार लायन डॉ मृणाल गांधी तसेच सर्व कार्यकारिणी सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
नवीन सभासद कौस्तुभ देशपांडे व संदीप पिटके याना RC महेश नाळे (PMJF) यांनी लायन्सची शपथ देऊन क्लबमध्ये स्वागत केले.
या प्रसंगी प्रमुख वक्ते उपप्रांतपाल-२ लायन मंगेश दोशी यांनी लायन्सच्या ब्रीदवाक्याला अनुसरून समाजसेवा, नेतृत्व, संघभावना आणि मानवतेची सेवा या विषयांवर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
यावेळी विविध समाजोपयोगी सेवा उपक्रमही राबविण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे उपप्रांतपाल-२ लायन मंगेश दोशी (पिएमजेएफ),  रिजन चेअरपर्सन RC महेश नाळे (पिएमजेएफ), झोन चेअरपर्सन ला.उन्मेष आटपाडीकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
याशिवाय फाऊंडर मेंबर लायन डॉ अजित गुंडेवार, लायन राजेंद्र शिंदे, लायन कैलास कारंडे, लायन डॉ शीतल फडे, लायन राजीव कटेकर, यांच्यासह मोठ्या संख्येने लायन सदस्य, मान्यवर व कुटुंबीय उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन व संपूर्ण आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि दर्जेदार पद्धतीने पार पडले. Rooted in service या ब्रीदवाक्य सोबत सेल्फ पॉईंट यामुळे हा सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील असा ठरला.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन. ला. माधुरी जाधव प्रास्ताविक अध्यक्ष ला.सी ए अतुल कौलवार यांनी केले .तर आभार ला. डॉ. मृणाल गांधी यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages