नातेपुते महाविद्यालयात विद्यापीठाचा वर्धापन दिन व महामानवांची जयंती, पुण्यतिथी साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 4, 2026

नातेपुते महाविद्यालयात विद्यापीठाचा वर्धापन दिन व महामानवांची जयंती, पुण्यतिथी साजरी

 नातेपुते महाविद्यालयात विद्यापीठाचा वर्धापन दिन व महामानवांची जयंती, पुण्यतिथी साजरी



नातेपुते  (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय नातेपुते येथे सोलापूर विद्यापीठाचा वर्धापन दिन ,  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी  विविध उपक्रमातून संयुक्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. दिनांक १ऑगस्ट रोजी नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय नातेपुते या महाविद्यालयात एन.एस. एस विभाग, मराठी विभाग,ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. प्रथम सकाळी    अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. भगवानराव साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. डॉ.कमल कांबळे यांनी आपली मनोगत व्यक्त केले.
यानंतर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर या विद्यापीठाचा वर्धापन दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भगवानराव साळुंखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. त्यांनी   विद्यापीठातील विविध अभ्यासक्रम व विद्यापीठाचे व्यवस्थापन या संदर्भात सर्वांना मार्गदर्शन केले.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने ग्रंथालयामध्ये "वाचन लेखन उपक्रम" घेण्यात आला. तसेच "ग्रंथदिंडी" काढण्यात आली.वाचन लेखन उपक्रम व ग्रंथदिंडी कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला.तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग,मायक्रोबायोलॉजी विभाग,महिला तक्रार निवारण समिती,यांच्यावतीने "करियर गायडन्स",अमली पदार्थ व तंबाखूजन्य पदार्थ यांचे सेवन न करणे,व आर्ट ऑफ लिविंगचे विद्यार्थ्याच्या जीवनात महत्त्व या विविध विषयावर कु.पाटील,व सौ.रुपनवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सर्व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवानराव साळुंखे उपस्थित होते.या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.पुष्पा सस्ते व प्रा.नारायण माने,आभार प्रा.राजेंद्र साठे यांनी मानले. वरील सर्व कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.जगदीशचंद्र मुळीक, प्रा.उत्तम सावंत, प्रा.डॉ.बी.टी.निकम, प्रा.डॉ.डी.जी.शहाणे, प्रा.श्रीकांत पवार, प्रा.डॉ.सुनिता सूर्यवंशी,आय क्यू.ये. सी.समन्वयक प्रा.डॉ.संभाजी बनसोडे,प्रा.पंकज कोडलकर, प्रा.सतीश पाटील, ग्रंथपाल श्री.दिलीप शिंदे,कार्यालयीन प्रमुख हनुमंत वाघमोडे, नागराज करपे,सर्व विभागाचे प्राध्यापक प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी विद्यार्थिनी,स्वयंसेवक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages