शिवाजी महाराजांचे विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी- संजय नवले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 21, 2026

शिवाजी महाराजांचे विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी- संजय नवले

 शिवाजी महाराजांचे विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी- संजय नवले




 सिंहगड महाविद्यालयाचा शिवजन्मोत्सवाचा पोवाडा ठरला लक्षवेधी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बुधवारी रात्री आयोजित पाळणा सोहळ्यात श्री शिवाजी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ ट्रस्ट यांच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सदाबहार पोवाड्याने उपस्थितांची मने जिंकली.

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी—म्हणजेच ‘सिंहगड’च्या मावळ्यांनी—डफावर थाप टाकीत सादर केलेल्या पोवाड्याने परिसरात शिवकालीन शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रभावना साकारली. ताल-लयीतल्या सादरीकरणामुळे कार्यक्रमास उत्साहाचे वातावरण लाभले. ही संकल्पना सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. संजय नवले सर म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व कार्य आजच्या पिढीसाठी सदैव प्रेरणादायी असून त्यांच्या आदर्शांवर चालणे हीच त्यांना खरी मानवंदना आहे.”

यावेळी कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, मुख्य निबंधक डॉ. डी. आय. नवले तसेच प्रा. शशिकांत हिप्परगी, योगेश शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शाहीर प्रांजल शिंदे, ऋतूराज कावडे, सुदर्शन माने, निलप्पा कुंभार, सुधर्म कुलकर्णी, पल्लवी मड्याळ, श्रीनिधी तुळजापूरकर, साकेत कांबळे, आणि अथर्व साठे यांनी पोवाड्याचे गायन केले; तर विश्वजित माने, आर्यन कोकणे, वरद कुलकर्णी, श्री जाधव आणि अधिराज कोकाटे यांनी साथसंगत केली. उपस्थितांनी सादरीकरणाचे जोरदार कौतुक केले.


चौकट

✓ दोऱ्यांनी साकारली शिवरायांची प्रतिमा

 चित्रकार विपुल मिरजकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सुभाष पवार  यांच्या संकल्पनेतून  35 हजार मीटर दोऱ्याचा वापर करून शिवरायांची प्रतिमा साकारली होती. त्यांचे ही कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळेस मध्यवर्ती ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, उत्सव अध्यक्ष जयवंत सलगर, कार्याध्यक्षा उत्तरा बरडे- बचुटे यांची, भाजपा शहराध्यक्ष  रोहिणी तडवळकर, राजन जाधव, श्रीकांत घाडगे यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages