शिवजयंती व शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्कूल बॅग वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 21, 2026

शिवजयंती व शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्कूल बॅग वाटप

 शिवजयंती व शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्कूल बॅग वाटप





अकलूज (कटूसत्य वृत्त):- हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच अकलूज नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २० फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद मुला-मुलींची शाळा नंबर ३ व १ मधील १०२ विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप अकलूज नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष  शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्तुत्य उपक्रमाचे संयुक्त आयोजन नगरसेवक मोहसिन शेख व नगरसेवक अझरुद्दीन शेख यांच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमप्रसंगी नगरसेविका मंदाकिनी पाडोळे, नगरसेवक सचिन देशमुख, लखन गायकवाड, प्रदेश अल्पसंख्याक सरचिटणीस मुख्तारभाई कोरबू, सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष साजिद सय्यद, माजी ग्रामपंचायत सदस्य अन्वरहुसेन बागवान, शंकरनाना गायकवाड, रफीअहमद कोरबू, इर्शाद काझी, रफिक पठाण, शकील मुलाणी सर, हसन बागवान, डॉ. फैज सय्यद, शालेय समितीचे चंदन कोतमिरे, मोहिद्दीन शेख, फारुक शेख, इन्नूसबाबा सय्यद, अल्ताफ मुलाणी, शोएब बागवान, जुनेद कोरबू, फरीद बागवान शाळेचे शिक्षक-शिक्षिका आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लावणारा हा उपक्रम उत्साहात आणि आनंदात पार पडला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages