Hot Posts

6/recent/ticker-posts

मोकाट कुत्र्यांच्या नसबंदी शस्त्रक्रियांची दैनंदिन संख्या वाढवावी : डॉ. ओम्बासे

मोकाट कुत्र्यांच्या नसबंदी शस्त्रक्रियांची दैनंदिन संख्या वाढवावी : डॉ. ओम्बासे


सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी जुना पुना नाका येथील महापालिकेच्या श्वान निर्बीजीकरण व लसीकरण केंद्रास भेट दिली. या केंद्रातील नसबंदी शस्त्रक्रियाची दैनंदिन संख्या वाढवण्याच्या दृष्टीने केंद्रातील पिंजऱ्यांची क्षमता वाढवावी यासह विविध सूचना महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी अधिकारी आणि संस्था चालक यांना दिल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पशु शल्यचिकित्सक डॉ. सतीश चौगुले, भरत शिंदे, नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्था, नंदूरबारचे प्रकल्प संचालक गौतम शिरसाट व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी श्वान निर्बीजीकरण व लसीकरण केंद्रामधील प्रक्रियेसाठी पकडण्यात आलेल्या भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या देखभालीबाबत तसेच दैनंदिन कामकाजाची माहिती घेतली. संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी भटक्या कुत्र्यांना पकडण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. आयुक्तांनी संस्थेच्या पशुवैद्यकाद्वारे करण्यात येत असलेल्या कुत्र्याची नसबंदी शस्त्रक्रिया समक्ष पाहणी करत त्याबाबत माहिती घेतली.

या केंद्रातील नसबंदी शस्त्रक्रियाची दैनंदिन संख्या वाढवण्याच्या दृष्टीने केंद्रातील पिंजऱ्यांची क्षमता वाढविण्याबाबत आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी उपस्थित अधिकारी व संस्था चालक यांना सूचना दिल्या. केंद्र शासनाच्या नियमानुसार शास्त्रोक्त पध्दतीने सोलापूर शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्याबद्दल योग्य प्रकारे नियोजन करून काम करण्याबाबतही सूचना दिल्या.

 

Reactions

Post a Comment

0 Comments