दगडफेक प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात २५ जणांवर गुन्हे दाखल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 27, 2025

दगडफेक प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात २५ जणांवर गुन्हे दाखल

 दगडफेक प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात २५ जणांवर  गुन्हे दाखल


सोलापूर  (कटूसत्य वृत्त):- बाबा कादरी मस्जिद आणि पंजाब तालीम परिसरात झालेल्या
दगडफेक प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात २५ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामधील एकाला अटक करण्यात आली आहे.रविवारी (दि. २५) रात्री साडेनऊच्या सुमारास बाबा कादरी मस्जिद येथे दोन गटोंत वाद झाला.वादाचे पर्यावसन दगडफेकीत झाले. त्यानंतर पंजबा तालीम परिसरात हाच गट आमने सामने आला यावेळी मिळेल ते साहित्य एकमेकांच्या दिशेने भिरकवण्यात आले. यात दगड, वीट,पेव्हर ब्लॉक, काठ्या वापरण्यात आल्या. यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण झाले.परिसरातील नागरिकांनी दुकाने बंद केली. यानंतर पोलिसांची कुमक दाखल झाली. पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी घटनास्थळी येऊन शांतता बाळगण्याचे आवाहन केले. परिस्थिीत नियंत्रणात आल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे वृत्त नरेश मस्के यांनी फिर्याद दिली आहे.गाडीला रस्ता देण्याच्या कारणावरून समद ऊर्फ अल्लू मकतून शेख, नवाब जब्बार शेख, अशपाक जब्बार शेख,शक्कर, शानू जब्बार यांनी नरेश मस्के यांच्यासह त्यांचे वडील सुरेश मस्के,मित्र राजू नांदणेकर, विकास मस्के,बालाजी चंद्रबन्सी यांना शिवीगाळ करीत लोखंडी पाईपने मारहाण केली.त्यानंतर त्यांच्या सोबतच्या पंधरा ते वीस लोकांनी घरावर तसेच गल्लीतील अॅटो रिक्षा, चार पाच दुचाकी वाहने यांच्यावर दगडफेक केली असल्याचे फिर्यादीत म्हटलेआहे. त्यानुसार फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी अशपाक जब्बार शेख यास अटक करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages