Hot Posts

6/recent/ticker-posts

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे सीईओ कुलदीप जंगम यांनी दिले आदेश

 आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे सीईओ कुलदीप जंगम यांनी दिले आदेश



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जुलै महिन्यात आषाढी वारी आहे. आषाढी वारीत विविध मार्गावरून नऊ ते दहा प्रमुख पालख्या पंढरपुरात दाखल होतात. त्या मार्गावरील रस्ते देखभाल, दुरुस्ती आणि नवीन रस्ते करण्यासाठी तीन कोटी ८० लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेने मंजूर केला आहे. ही दर्जेदार करावीत, असे आदेश जिल्हा तयारी आषाढी वारीची परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिले आहेत. सीईओ जंगम यांनी ग्रामीण मार्ग जिल्हा मार्गावरील १५ रस्त्यांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी तीन कोटी ८० ठेकेदारांना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या वीस ते पंचवीस दिवसांत रस्त्यांची कामे पूर्ण करावी लागणार आहेत.दरम्यान, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी पालखी मार्गावरील रस्त्यांची पाहणी करून गरज असलेल्या रस्त्यांना मंजुरी दिलीआहे. तसेच अनेक ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचेही आदेश आहे. लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली दिले आहे. तसेच पालख्या दाखल होण्याच्या अगोदर सर्व रस्त्यांची
देखभाल, दुरुस्ती करण्याच्या सूचना आषाढी वारीच्यानिमित्ताने जिल्ह्यात वेगवेगळ्या मार्गावरुन पालख्यांचे व दिंड्यांचे आगमन होत असते. पंढरीच्या पांडुरंगला भेटण्यासाठी वारकरी चालत पंढरीच्या दिशेने येतात. त्या भाविकांना चालताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची काळजी जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली आहे. ज्या मार्गावरुन दिंड्या येणार आहेत, ते मार्ग दुरुस्त करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. पण, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. अशा स्थितीत रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाचा दर्जा राखण्याचे आदेश ठेकेदारांना दिले आहेत. त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा जिल्हा परिषद प्रशासनाला आहे.

चौकट
जिल्ह्यातील या रस्त्यांची होणार कामे
करमाळा तालुक्यातील रावगाव झोपडपट्टी ते कर्जत रस्ता, माळशिरस तालुक्यातील पवारवाडी,
गुरसाळे, मुंजवडी रस्ता ते माळशिरस, तोंडले ते माळशिरस रस्ता, बोरगाव ते पाटीलवस्ती, मांडवे ते नातेपुते, वेळापूर निमगाव ते म्हेत्रे मळा, निमगाव ते निमगाव बनकरमळा रस्ता, सदाशिवनगर ते मांडवे, पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला ते पंढरपूर रस्ता, विष्णुपद रस्ता ते पंढरपूर रस्ता, पिराची कुरोली ते तळवाट घाट रस्ता, करकंब ते तुळशी रस्ता, ६५ एकर ते विसावा रस्ता, वाखरी येथील रस्ता, भटुंबरे, पखालपूर, मेंढापूर ते पंढरपूर रस्त्यांचा समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम " जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप ग देखभाल, दुरुस्तीसाठी तीन कोटी ८० लाखांचा निधी मंजूर केला आहे.सीईओ जंगम यांनी कामे दर्जेदार करण्याच्या सूचना ठेकेदारांना दिल्या आहेत. त्यानुसार रस्त्यांची कामे होणार आहेत.
संदीप कोहिणकर, अतिरिक्त सीईओ



Reactions

Post a Comment

0 Comments