भिडेंनी रायगडावर पाय ठेऊन दाखवावा मराठा समाजाचे आव्हान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 27, 2025

भिडेंनी रायगडावर पाय ठेऊन दाखवावा मराठा समाजाचे आव्हान

 भिडेंनी रायगडावर पाय ठेऊन दाखवावा मराठा समाजाचे आव्हान



सोलापूर  (कटूसत्य वृत्त):- किल्ले रायगड येथे सहा जूनला होणारा राज्याभिषेक सोहळा नामशेष झाला पाहिजे, असे विधान संभाजी भिडे यांनी केल्याने राज्यात त्याचे पडसाद उमटले आहेत. सोलापुरातील मराठा समाज भिडेंच्या विरोधात आक्रमक झाला आहे. सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, राजन जाधव, विनोद भोसले यांनी भिडेंच्या विधानाचा समाचार घेत सहा जूनला रायगडावरचा राज्यभिषेक सोहळा रोखण्यासाठी तेथे पाय ठेऊनच दाखवावा,असे खुले आव्हान भिडेंना दिले आहे.
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ले रायगड येथे सहा जूनला राज्यभिषेक सोहाळा साजरा केला जातो.राज्यातून मोठ्या प्रमाणात शिवभक्त किल्ले रायगडावर येतात. अनेक वर्षापासून ही परंपरा चालू आहे. मात्र भिडेंनी दोन दिवसांपूर्वी राज्यभिषेक
सोहळ्याविषयी विधान करून राज्यात वांदग निर्माण केले आहे. किल्ले राजगडावरील राज्याभिषेक
सोहळा नामशेष झाला पाहिजे, सहा जूनऐवजी तिथीप्रमाणे राज्यभिषेक सोहळा झाला पाहिजे, असे
त्यांनी म्हटले आहे. त्यामधील 'नामशेष झाला पाहिजे' हे विधान शिवप्रेमींच्या जिव्हारी लागले
आहे. त्यामुळे भिडेंच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. प्रशांत कोरटकर, राहुल
सोलापूरकर यांनी केलेल्या विधानावेळी भिडे मूग गिळून गप्प का होते. असा प्रतिप्रश्न भिडेंना
विचारला आहे.


चौकट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या
नावाने जगतात. महाराजांची
बदनामी करतात. त्यांना महाराष्ट्रात फिरू देऊ
नये. तोंडाला काळे फासून प्रत्येक जिल्ह्यातून
धिंड काढली पाहिजे.
राजन जाधव, समन्वयक,
सकल मराठा समाज

छत्रपती शिवाजी महाराजांचे
शिवप्रेमींमध्ये असलेले वलय कमी
करण्याचा प्रयत्न भिडेंच्या माध्यमातून
केला जात आहे. त्यांचे दाखवायचे दात आणि
खायचे दात वेगळे आहेत. बहुजन समाजामध्ये
तेढ निर्माण करण्याचा त्यांचा उद्योग आहे.
• विनोद भोसले, शिवभक्त

भिडे गुरुजी यांच्या भूमिकेला हिंदू समाजाचा पाठिंबा आहे.
आपण हिंदू धर्मातील दिवाळी असो किंवा दसरा, बुद्ध
पौर्णिमा असे सण तिथीनुसारच साजरे करतो. श्री शिवछत्रपतींच्या
समकालीन असलेल्या शिवभारत अथवा अन्य कोणत्याही बखरीत
तारखेचा उल्लेख नाही. मुळात त्याकाळी इंग्रजी कॅलेंडरच अस्तित्वात
नव्हते. दुर्गराज किल्ले श्री रायगडावरील शिलालेखातही तिथीचाच
उल्लेख आहे. सर्वच सण तिथीनुसारच साजरे होत असताना श्री
शिवराज्याभिषेक दिनच तारखेनुसार करण्यामागे काय प्रयोजन आहे?
दरवर्षीप्रमाणे हिंदू बांधव यंदाही ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीलाच अर्थात नऊ
जूनला श्री शिवराज्याभिषेक दिन साजरा करतील.
- विठ्ठलराव साठे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान.

छत्रपती शिवाजी
महाराजांचे सिंहासन
सोनेरी करण्यासाठी जमा
केलेले सोने कोठे आहे. त्यांचा
हिशोब का दिला नाही,
महाराजांच्या नावावर आपली
झोळी भरून घेणारे भिडे
आहेत.
- माऊली पवार, समन्वयक,
सकल मराठा समाज

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages