लाडक्या बहिणींसाठी खूशखबर ! 40 हजारांपर्यंत कर्ज मिळणार, कधी अन् कसे वाचा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 12, 2025

लाडक्या बहिणींसाठी खूशखबर ! 40 हजारांपर्यंत कर्ज मिळणार, कधी अन् कसे वाचा

 लाडक्या बहिणींसाठी खूशखबर !

 40 हजारांपर्यंत कर्ज मिळणार, कधी अन् कसे वाचा

मुंबई(कटूसत्य वृत्त):- लाडक्या बहिणींसाठी मोठी खूशखबर समोर आली आहे. लाडक्या बहिणींसाठी आधीच भरीव कामगिरी करण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत आहे, अशा स्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक गोड बातमी दिली आहे. लाडक्या बहिणींना योजनेअंतर्गत 40 हजारांपर्यंत कर्ज दिलं जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याबाबत सरकार प्रयत्नशील आहे असेही त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात ऑगस्ट 2024 पासून लाडकी बहिण योजनेतील महिला लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये महाराष्ट्र सरकार देत आहे. यंदा दहावा हप्ता वितरीत झाला आहे. आता सरकार या योजनेसाठी आणखी चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, लाडक्या बहिणींना राज्यसरकार दरमहा दीड हजार रुपये देते, या योजनेवर जवळपा, 45 हजार कोटी रुपये खर्च होतात. या योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या हप्त्यात थोडासा विलंब झाला तर विरोधक ही योजना बंद होणार असल्याच्या अफवा पसरवतात, त्यावर विश्वास ठेवू नका. ही योजना बंद होणार नाही असेही ते म्हणाले.

अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी आम्ही नवीन प्रस्ताव आणला आहे. मी जिल्हयातील बँकेसोबत संवाद साधणार आहे. काही सहकारी बँका चांगल्या असून लाभार्थ्यांना चाळीस हजारांपर्यंत कर्ज देऊन कर्जाचा हप्ता योजनेतून वळते केले जातील असंही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages