Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांवर संकट, कांद्याच्या दरात मोठी घसरण, निर्यात पूर्णपणे ठप्प

 शेतकऱ्यांवर संकट, कांद्याच्या दरात मोठी घसरण, निर्यात पूर्णपणे ठप्प



मुंबई (कटूसत्य वृत्त):- अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर शेतमालाच्या दराचे संकट आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. त्यात भारत आणि पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या संकटामुळे भर पडली आहे.

आता शेतकऱ्यांचा कांदा हजार रुपयांपर्यंत घसरला आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. आता नाफेडकडून सुरु होणाऱ्या कांदा खरेदीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

नाशिकमधील लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर गडगडले असून शेतकऱ्यांवर संकट आले आहे. कांदा 1 हजार रुपये क्विंटलपर्यंत घसरला आहे. बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. दर घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. भारत पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच भारताने पाकिस्तानसोबत होणारी निर्यात बंद केली. त्यामुळे कांद्याचे दर घसरले. तसेच बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे कांदा निर्यातीत घट झाली आहे. तसेच बांगलादेशात 30 टक्क्यांनी अधिक उत्पादन झाले आहे.

नाफेड एनसीसीएफ यांनी अद्याप कांदा खरेदी सुरु झाली नाही. नाफेड आणि एनसीसीएफकडून कांदा कधी सुरु होते, त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कांद्याची आवक जास्त आणि बाजारात कमी मागणी अशी परिस्थिती सध्या आहे. देशांतर्गत कांदाचा पुरवठा वाढल्याने थेट कांदा दरावर परिणाम आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजारात उन्हाळी कांद्याला 1151 रुपये दर मिळाला. नाशिक बाजार समितीत हा दर 900 रुपये होता. येवला बाजार समितीत केवळ 851 रुपये दर मिळाला. मनमाड, पिंपळगाव बसवंत बाजारात 1100 रुपये कांद्याचा दर राहिला.

देशात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते. आशिया खंडात लासलगाव कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. परंतु गेल्या महिन्याभरात नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्याचा फटका कांद्या उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला. अवकाळी पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा, कांदा बियाणे तसेच आंबा पिकाला फटका बसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments