Hot Posts

6/recent/ticker-posts

कुमठे कनिष्ठ महाविद्यालयात वकृत्व स्पर्धेचे संपन्न

 कुमठे कनिष्ठ महाविद्यालयात वकृत्व स्पर्धेचे संपन्न



    
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात सहकार तपस्वी कै. ब्रह्मदेव दादा माने यांच्या 23 व्या स्मृतिदिनानिमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 11वी व 12 वी कला व वाणिज्य विभागातील 35 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाची सुरुवात कै. ब्रह्मदेव दादा माने यांचे प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दीपक शिंदे यांनी केले व प्रा.दादाराव डांगे यांनी वकृत्व स्पर्धेचे नियम विषद केले.  या स्पर्धेत विविध विषय देण्यात आले होते. या विविध विषयावर विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले.
या वकृत्व स्पर्धेत
 कु. तबस्सुम  हुंडेकरी (12 वी कला ) - प्रथम
कु. राजश्री राजूरकर( 12 वी कला ) - द्वितीय
कु. पल्लवी पवार (12 वी कला ) - तृतीय
 व  उत्तेजनार्थ 
कु. श्रद्धा जाधव (11 वी वाणिज्य ) 
व कु. गंगोत्री राठोड ( 12वी वाणिज्य) 
यांना देण्यात आला.
या सर्व विजेत्यांचे संस्थेचे मुख्य विश्वस्त श्री जयकुमार माने, विश्वस्त स्वातीताई माने, प्राचार्य जयसिंग गायकवाड, ज्युनियर कॉलेजचे  प्रमुख प्रा. संजय जाधव यांनी अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. विजयकुमार वाळके पाटील  व प्रा. बंडोपंत बाबर यांनी प्रयत्न केले. परीक्षक प्रा. दीपक शिंदे व प्रा. राजीव निकम यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे आभार प्रदर्शन प्रा. विनोद थोरात यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments