वाशिंबेत विजय जल्लोष आरक्षणाचा
वाशिंबे (कटूसत्य वृत्त):- आरक्षणाची बातमी समजताच वाशिंबे ता.करमाळा येथिल मराठा सकल मराठा समाज युवकांनी फटाके फोडत, गुलाल उधळण करत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्यात आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाल्याचा आनंद एकमेकांना पेढे भरवत साजरा केला.आझाद मैदानावर गेल्या पाच दिवसांपासून चालू असलेल्या उपोषणाला राज्य सरकारने मान्यता दिली असून, त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.यानंतर मराठा समाजात गावोगावी राज्यात जल्लोष उधळला जात असून, गावोगावी विजयाची धूम पसरली आहे.
0 Comments