Hot Posts

6/recent/ticker-posts

भारतीयांच्या पैशांवर ब्राह्मण नफा कमवतात

 भारतीयांच्या पैशांवर ब्राह्मण नफा कमवतात

ट्रम्प प्रशासनाच्या व्यापारविषयक सल्लागारांचे विधान

न्यूयॉर्क (पीटीआय) 'भारत रशियाकडून तेलखरेदी करीत असल्याबद्दल अमेरिकेची आगपाखड सुरू असतानाच अमेरिकेच्या अध्यक्षांचे व्यापारविषयक सल्लागार पीटर नवारो यांनी "भारतीय जनतेच्या पैशांवर ब्राह्मण नफा कमावत आहेत,' असे विधान केल्याने संपूर्ण ब्राह्मण वर्गात खळबळ माजली आहे.

"सामान्य भारतीयांचे नुकसान करून तुम्ही ब्राह्मणांचा फायदा करून देत आहात," असेही विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे ब्राह्मण राजकीय नेते व अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात संतापलेला दिसून येते आहे.

ट्रम्प प्रशासनाचे व्यापार व उत्पादनविषयक वरिष्ठ सल्लागार पीटर नवारो 'फॉक्स न्यूज संडे' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.पीटर म्हणाले, "भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असताना भारतीय नेते रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना कसे सहकार्य करत आहेत हे मला समजत नाही. म्हणून मी फक्त एवढेच म्हणेन की, भारतीय नागरिकांनी कृपया येथे काय चालले आहे ते समजून घ्यावे. तुम्ही ब्राह्मणांना नफा मिळवून दिला. हे थांबवण्याची गरज आहे. भारत रशियासोबत व्यापार करीत असून, भारतीयांचे नुकसान करून ब्राह्मणांचे खिसे भरण्याचे काम सुरू आहे. आपल्याला ते थांबवावे लागेल. भारत रशियाकडून कच्चे तेल आयात करत असून त्यावर प्रक्रिया करून ते प्रीमियम दर्जाचे तेल म्हणून युरोपला विकत आहे.'

अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आधी २५ टक्के आणि नंतर रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतो म्हणून अतिरिक्त २५ टक्के आयातशुल्क लागू केले आहे. या संदर्भात भारताने अधिकृत भूमिका अद्याप जाहीर केलेली नसताना पीटर नवारो मात्र एकामागून एक भारतविरोधी विधाने करीत आहेत. अमेरिका व भारत यांच्यातील संबंध तणावपूर्ण असताना नवारो यांच्या ताज्या विधानाचीही त्यात भर पडली आहे.

“भारताने रशियाकडून कच्चे तेल आयात केल्यामुळे त्या पैशातून आलेल्या शस्त्रास्त्रांनी युक्रेनच्या नागरिकांची हत्या केली जात आहे. आपण करदाते म्हणून काय करायला हवे, याचा भारतीयांनी विचार करायला हवा," असा शहाजोगपणाचा सल्लाही नवारो यांनी दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. भारत स्वतः जगातली सर्वात मोठी लोकशाही असताना ते व्लादीमिर पुतीन आणि शी जिनपिंग यांच्याशी मैत्रीसंबंध का ठेवत आहेत? रशिया भारताला तेल विकून त्या बदल्यात मिळालेल्या पैशातून शस्त्रास्त्रे खरेदी करीत आहे आणि युक्रेनच्या नागरिकांची हत्या करीत आहे.

* पीटर नवारो, अमेरिकेच्या अध्यक्षांचे व्यापारविषयक सल्लागार

Reactions

Post a Comment

0 Comments