गणेश विसर्जनासाठी महापालिका व पोलिस प्रशासन सज्ज - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 3, 2025

गणेश विसर्जनासाठी महापालिका व पोलिस प्रशासन सज्ज

 गणेश विसर्जनासाठी महापालिका व पोलिस प्रशासन सज्ज

आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे व पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी केली विसर्जन स्थळांची पाहणी...

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-शहरातील गणेश विसर्जनाचा सोहळा निर्विघ्न व सुरळीत पार पडावा यासाठी सोलापूर महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे आणि पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी तुळजापूर रोडवरील खदान विसर्जन स्थळ, म्हाडा विहीर विडी घरकुल परिसर तसेच छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील विसर्जन कुंडांची पाहणी केली.

या वेळी अतिरिक्त आयुक्त रवि पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पोलीस उपायुक्त मुख्यलय गौर हसन पोलिस उपायुक्त विजय काबाडे,पोलीस उपायुक्त पाटील मॅडम, नगर अभियंता सारिका आकुलवार,मनपा विभागीय अधिकारी यांच्यासह महापालिकेचे आणि पोलिस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विसर्जनासाठी विशेष तयारी

महापालिकेकडून शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गांवर खड्डे बुजवणे, झाडांच्या फांद्या छाटणे, प्रकाशयोजना सुधारणे यासह आवश्यक दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. विसर्जनासाठी स्वतंत्र गाड्या व कर्मचारी नेमण्यात आले असून, शहरातील एकूण ७९ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रांची उभारणी करण्यात येत आहे.११ विसर्जन कुंड आणि स्वच्छता व आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था केली जात आहे.


आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी मूर्ती सकलन केंद्र तसेच विसर्जन कुंड येथे आवश्यक त्या उपययोजना  तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देत सांगितले की, “गणेशोत्सव हा श्रद्धा आणि भक्तीचा उत्सव असून तो सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य द्यावे.”

पोलीस बंदोबस्ताची आखणी

गणेश विसर्जनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष बंदोबस्ताची योजना आखण्यात आली आहे. महत्त्वाच्या विसर्जन स्थळांवर अतिरिक्त पोलीस तैनात राहणार असून वाहतूक सुरळीत राहावी यासाठी स्वतंत्र वाहतूक नियोजन करण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलीस पथके, वाहतूक शाखेचे अधिकारी तसेच पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे.

पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी यावेळी सांगितले की, “गणेश विसर्जन सोहळ्यात नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले असून विसर्जन स्थळांवर पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही नजर तसेच शिस्तबद्ध वाहतूक यावर विशेष भर देण्यात येणार आहे.”

नागरिकांना आवाहन

महापालिकेच्या वतीने गणेश भक्तांना आवाहन करण्यात आले आहे की, विसर्जनासाठी स्थापन करण्यात आलेल्या मूर्ती संकलन केंद्रांचा उपयोग करावा व प्रशासनाला सहकार्य करून गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्धपणे साजरा करावा असे आव्हान महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages