अकलूजच्या फार्मसी महाविद्यालयात गणपती उत्सव जल्लोषात साजरा
अकलूज (कटूसत्य वृत्त):- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ७ दिवसाचा गणपती उत्सव शिक्षण प्रसारक मंडळच्या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय (पदविका), अकलुज येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी दिवशी गणेशस्थापना विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आली,यावेळी डी.फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य देवडकर, सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये एकीची भावना निर्माण करणे व आपली संस्कृती जपणे हा या उत्सवाचा मुख्य उद्देश होता.गणपती उत्सव २०२५ अंतर्गत महाविद्यालयात रांगोळी,मेहंदी,चित्रकला,मोदक बनवणे व टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू बनवणे यासारख्या स्पर्धा घेण्यात आल्या.सर्व स्पर्धांचे परिक्षण करण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांनी या उत्सवात आनंदाने सहभाग घेतला व सर्व स्पर्धांचा आनंद लुटला.सातव्या दिवशी ०२ सप्टेंबर रोजी सत्यनारायण पुजा करुन,महाप्रसाद घेऊन सर्वांनी गणपती बाप्पाला निरोप दिला.
0 Comments