१३ किलो ४५० ग्रॅम गांजासह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त
करमाळा (कटूसत्य वृत्त):- करमाळा तालुक्यातील केम-कंदर रोडवर पोलिसांनी सोमवारी सापळा रचून केलेल्या कारवाईत तिघांना गांजासह ताब्यात घेतले. या कारवाईतून तब्बल १३ किलो ४५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत ३, ३६, २५० रुपये एवढी आहे. करमाळा पोलिसांनी तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१ सप्टें. रोजी स. ११.४० वा. पोसई सुशीलकुमार पाखरे यांना गोपनीय बातमी मिळाली कि, केम-कंदर या रोडने तिघे जण स्कुटर व चारचाकी वाहणात असून ते गांजा विक्रीसाठी घेऊन येणार आहेत, त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यासाठी लागणारे लेखी अधिकार पत्र घेऊन पोलिसांनी कारवाईची सूत्रे हलवली.
सदर ठिकाणी गेल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार केम-कंदर रोडवर पोलिसांनी सापळा रचला व काही क्षणात केमकडून कंदरच्या दिशेने एक बिगर नंबरची स्विफ्ट कार व बिगर नंबरची ऍक्टिवा स्कुटर येताना दिसल्याने संशय आला व त्यास थांबण्याचा इशारा केला असता ते थांबले नाही. त्यानंतर त्या वाहनांचा पोलिसांकडून पाठलाग करून पकडण्यात आले. कारवाईत ऍक्टिवा स्कुटरवरून प्रवास करणारा सचिन नागनाथ निवाळ (वय २६, रा. वेणेगाव, ता. माढा, जि. सोलापूर) तसेच स्विफ्ट कारमधील आकाश उर्फ सोन्या उत्तरेश्वर गोसावी (वय २६, रा. ता. माढा, जि. सोलापूर) व सचिन सुरेश बावळे (वय ४०, रा. ता. माढा, जि. सोलापूर) यांची नावे निष्पन्न झाल्यानंतर, वाहणांची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये ऍक्टिवा स्कुटर मध्ये चिकट पट्टीने पॅक केलेले एक पॅकेट तर स्विफ्ट कार मध्ये चिकट पट्टीने पॅक केलेले पाच पॅकेट मिळून आले. सदरची सहा पॅकेट उघडून पाहिले असता, त्यामध्ये झाडपत्ती सारखा ओलसर व उग्र वास येणारा गांजा असल्याचे दिसून आले.
सदर आरोपीकडून १३ किलो ४५० ग्रॅम (प्रति किलो, अंदाजे भाव २५, ००० रु. प्रमाणे) ३,३६,२५० रु. किंमतीचा गांजा व ऍक्टिवा स्कुटर कींमत ७५,००० रु. व स्विफ्ट कारची किंमत ४,००,००० रु. असे एकूण ८,११,२५० रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोना मनीष पवार यांनी आरोपींच्या विरुद्ध सरकारतर्फे फिर्याद दिली असून गुरनं ७२५/२०२५ अन्वये एन.डी.पी.एस ऍक्ट कलम ८ (क) २० (ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (भा.पो.से), अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस, करमाळा पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई सुशीलकुमार पाखरे, सपोफौ शिनगारे, पोहेकॉ आप्पासाहेब लोहार, पोहेकॉ अजित उबाळे, पोना मनीष पवार, पोना वैभव ठेंगल, पोकॉ रविराज गटकूळ, पोकॉ मिलिंद दहीहांडे, पोकॉ अर्जुन गोसावी, पोकॉ येवले, पोकॉ भराटे, पोकॉ रंदील, पोकॉ खोटे, पोकॉ प्रसाद काटे तसेच सायबर पो ठाणकडील पोहेकॉ व्यंकटेश मोरे यांनी केली आहे.
सदरील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशीलकुमार पाखरे हे करीत आहेत.
करमाळा पोलिसांचा हा धडाकेबाज उपक्रम तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
0 Comments