Hot Posts

6/recent/ticker-posts

संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश आल्याने टेंभुर्णी येथे फटाक्या उडवून व लाडू वाटप करून जल्लोष

 संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश आल्याने टेंभुर्णी येथे फटाक्या उडवून व लाडू वाटप करून जल्लोष




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे  मुंबई आझाद मैदान येथे 29 तारखेला उपोषणास बसले होते त्यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस असल्याने सरकारने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून तात्काळ मराठा आरक्षणाची अंमलबजावणी तसेच मनोज जरंगे यांच्या पाच मागण्या सरकारकडून मान्य  त्यामध्ये पहिली मागणी
हैदराबाद गॅझेटियरला मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता तर दुसरी मागणी 
2) मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे सप्टेंबरअखेर मागे घेणार
तिसरी मागणी
३)सातारा गॅझेटियर महिन्याभरात लागू करणार
चौथी मागणी
4)आंदोलनासाठी बलिदान देणाऱ्यांना सरकार 15 कोटींची मदत देणार
पाचवी मागणी
5)58 लाख कुणबी नोंदींच्या याद्या ग्रामपंचायतीत लावणार
त्यामुळे आज टेंभुर्णी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनास यश आल्यामुळे मराठा मावळ्यांनी प्रथम अकलूज चौक येथे फटाकेची आतिश बाजी करत छत्रपती संभाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार घालून लाडू वाटण्यास सुरुवात केली त्या ठिकाणाहून घोषणा देत करमाळा चौकामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण करून फटाके वाजवून व करमाळा चौकातून प्रत्येक वाहन चालक व प्रवाशांना लाडू वाटप करून आरक्षणाचा आनंद उत्सव साजर करण्यात आला या वेळी,प्रहार संघटनेचे अमोल  जगदाळे, टेंभुर्णी चे सामाजिक कार्यकर्ते व सकल मराठा समाजाचे गोरख बाप्पा देशमुख, विठ्ठल आबा मस्के पाटील, प्राध्यापक दीपक पाटील सर ,रामकृष्ण भाऊ काळे ,दशरथ तात्या देशमुख, महावीर आबा महाडिक, सुधीर दादा पाटील ,किशोर आण्णा देशमुख, नानासाहेब देशमुख, संभाजी ब्रिगेडचे पपेश पाटील ,संतोष कोडलिंगे, शशिकांत देशमुख, शिवाजी येवले पाटील ,सिद्धेश्वर भाऊ काळभोर ,रणजीत आटकळे, नागेश देशमुख , अध्यक्ष प्रशांत देशमुख ,आप्पा आटकळे, रितेश देशमुख, भरत मस्के, सोमनाथ मस्के, अमित देशमुख, बळीराम डोके, बाळासाहेब आनपट  नवनाथ जाधव ,सागर महाडिक ,भाऊ देशमुख ,स्वप्नील शेळके, अमित भैया देशमुख , भारत जगताप,ईश्वर देशमुख, सुरज देशमुख अधिक जण उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments