Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते पोलिसांची कामगिरी, चोरीस गेलेले ५ लाखाचे लक्षात ठेव दागिने मूळ मालकास परत

 नातेपुते पोलिसांची कामगिरी, चोरीस गेलेले ५ लाखाचे लक्षात ठेव दागिने मूळ मालकास परत




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- ऑगस्ट २०२५ मध्ये चोरीच्या गुन्ह्यांतील ४ लाख ९७ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मूळ मालकांना परत केली आहे. विविध गुन्ह्यांतून हा मुद्देमाल चोरीस गेला होता. नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे व पोलीस सहकारी यांनी गोपनीय माहिती आणि सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने या गुन्ह्यांचा छडा लावून संबंधित मूळ मालकास ऐवज परत केला.तीन प्रमुख गुन्ह्यांच्या कारवाईत हे दागिने जप्त केले. पहिल्या प्रकरणात २४ हजारांचे ३० मोठ्या सोन्याच्या मण्यांच्या गळ्याची पोत, ९२ लहान मण्यांच्या गळ्याची पोत हे वैभव विठ्ठल आष्टी यांना परत करण्यात आले.दुसऱ्या प्रकरणात ९० हजारांची सोन्याची कंठी माळ, ६० हजारांचा नेकलेस, ३० हजार आणि ९ हजारांची सोन्याची अंगठी आणि रिंगासह एकूण २ लाख ५९ हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम परत करण्यात आली. रामदास चंद्रकांत पवार यांना हे दागिने परत करण्यात आले.तिसऱ्या प्रकरणात ८० हजारांचे मंगळसूत्र आणि ४० हजार  व २० हजार रुपयांचे दागिने हे वेगवेगळ्या मालकांना परत करण्यात आले.नातेपुते पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत दिघे व सहकारी पोलीस कर्मचारी यांनी ही कामगिरी बजावली.नातेपुते पोलिस ठाण्याने चोरीच्या गुन्ह्यांमध्ये तांत्रिक व तत्परतेने केलेल्या या कारवाईने पोलीस प्रशासनावर नागरिकांचा विश्वास वाढविला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments