संभाजी आरमारच्या सोहळ्यात ७ जोडपी विवाहबध्द - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 11, 2025

संभाजी आरमारच्या सोहळ्यात ७ जोडपी विवाहबध्द

  संभाजी आरमारच्या सोहळ्यात ७ जोडपी विवाहबध्द



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील संभाजी आरमारच्या वतीने आयोजित केलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात ७ जोडवी विवाहबध्द झाली. संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख सागर ढगे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते.याप्रसंगी माजी उपमहापौर नानासाहेब काळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी यांच्यासह राजन जाधव, प्रमोद वाघमारे, पेंटप्पा गड्डम, अनंत जाधव, विनोद भोसले,बापू ढगे, सुशील बंदपट्टे, संतोष केंगनाळकर, मतीन बागवान, लहु गायकवाड, नागेश खरात, यशवंत पाथरुड, उज्वला पाटील, चित्रा  कदम आदी उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गजानन जमदाडे, शशिकांत शिंदे, ज्ञानेश्वर डोंबाळे, अमित कदम, प्रा. मल्लिकार्जुन पोतदार, महेश घोडके, किरण ताकतोडे, पिंटू औरंगे, सचिन गायकवाड, अविनाश विटकर, गणेश निंबाळकर, उमा रजपूत, रेखा व्हनकडे, संध्या हेब्बाळकर, वर्ष ढगे, अश्विनी गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages