अक्कलकोट आयटीआयच्या व्यवस्थापन सदस्यपदी सोनकांबळे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 11, 2025

अक्कलकोट आयटीआयच्या व्यवस्थापन सदस्यपदी सोनकांबळे

 अक्कलकोट आयटीआयच्या

व्यवस्थापन सदस्यपदी सोनकांबळे


अक्कलकोट(कटुसत्य वृत्त):-

गोगावचे उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांची येथील श्री स्वामी समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) व्यवस्थापन समितीवर शासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
कमलाकर सोनकांबळे हे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे खंदे समर्थक आहेत. सिद्धार्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी युवकांसाठी विविध रोजगार निर्मितीबाबत उपक्रम राबविले. सम्यक उद्योग समूहाच्या माध्यमातून युवकांना व्यवसाय करण्यासाठी शासकीय योजनेची माहिती देण्याचे काम केले. कार्य करताना युवकांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. या सर्व कामाची दखल घेऊन अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेवर व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे
सोनकांबळे यांच्या निवडी बद्दल आमदार सचिन कल्याणशेट्टी, नगरसेवक मीलन कल्याणशेट्टी, सागर कल्याणशेट्टी, उद्योजक मधुकर सुरवसे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव अरोटे, रिपाइं तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप जगताप आदींनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages