बचेरी महालक्ष्मी यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचे मैदान पार पडले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 11, 2026

बचेरी महालक्ष्मी यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचे मैदान पार पडले

 बचेरी महालक्ष्मी यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचे मैदान पार पडले




माळशिरस (कटूसत्य वृत्त):- मौजे बचेरी येथे सालाबादप्रमाणे श्री महालक्ष्मी देवी यात्रेचे नियोजन करण्यात आले होते. यात्रेमध्ये पारंपारिक प्रथेप्रमाणे अनेक धार्मिक कार्यक्रम, कुस्ती मैदान व मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडले. यात्रेनिमित्त महालक्ष्मी देवी यात्रा व कुस्ती कमिटीच्या वतीने जंगी कुस्त्याचे मैदान आयोजित करण्यात आले होते हे मैदान महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष मल्ल सम्राट मा रावसाहेब आप्पा मगर यांचे मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत पार पडले. कुस्ती मैदानामध्ये शेवटची कुस्ती बेनापुर चे पैलवान नाथा पवार व काटीचे पैलवान गौतम शिंदे यांच्यामध्ये झाली. कुस्ती मैदानासाठी सोलापूर सांगली जिल्ह्यातील नामवंत तालमीतील वस्ताद व पैलवान मंडळी उपस्थित होते  तर कुस्ती मैदानात अनेक रंगतदार कुस्त्यांनी ग्रामस्थांची मने जिंकली. कुस्ती आखाड्याचे समालोचन ख्यातनाम समलोचक पवार यांनी केले. कुस्ती आखाड्यात महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब नगर निमगाव यांनी उपस्थिती लावली. तसेच माळशिरस पंचायत समितीचे सभापती माननीय दत्ता मगर, पंचायत समितीचे सदस्य शिवराज पुकळे,मा पंचायत समिती सदस्य शहाजी महाडिक शेट,पैलवान मोहन मदने, कुस्ती आखाडा नियोजन महालक्ष्मी देवी यात्रा व कुस्ती समिती तील सदस्य पैलवान रामभाऊ गोरड, पैलवान बंडू गाढवे,  प्रा सदाशिव शिंदे, नारायण शिंदे, अधिकराव माने शांतीलाल शिंदे , विकास सुळे विशेष कार्यकारी अधिकारी गणेश देशमुख तसेच यात्रा कमिटीचे सदस्य दत्तात्रय ढवळे दशरथ ढवळे सुदाम शिंदे रामभाऊ शिकारे धनाजी शिकारे बिराबाई शिंदे व ग्रामस्थांनी केले याप्रसंगी सर्व देणगीदार बंधूंचा फेटा बांधून सन्मान केला तसेच त्यांच्या हस्ते कुस्त्या लावण्यात आल्या, कुस्ती मैदानास सर्वात जास्त म्हणजेच 25001/- वर्गणी दिलेबद्दल श्री हरी इलेक्ट्रिकल वसई चे मालक बचेरी गावचे सुपुत्र श्री व सौ हरी नाना गोरड यांचे सर्वांनी कौतुक केले. त्यांचबरोबर सर्वच देणगीदार यांचे समिती व ग्रामस्थांनी तोंडभरून कौतुक केले. कुस्ती मैदानाचे नियोजन कुस्ती समितीच्या मार्गदर्शनाखाली पैलवान पैलवान रामभाऊ गोरड यांनी गेले दोन महिने परिश्रम घेऊन आखाडा यशस्वी केल्याबद्दल महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष मल्ल सम्राट रावसाहेब मगर यांनी अभिनंदन केले. कुस्ती मैदान पार पडण्यासाठी सर्व समितीने परिश्रम घेतले.  कुस्ती मैदानाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages