अनगरच्या पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल 97.07 टक्के
अनगर (कटूसत्य वृत्त):- कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अनगर येथील इयत्ता दहावी मार्च 2026 परीक्षेचा निकाल उल्लेखनीय लागला असून विद्यालयाने 97.07 टक्के यश संपादन केले आहे. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या 275 विद्यार्थ्यांपैकी 267 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये 80 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, 115 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 48 विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर 24 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाच्या उज्ज्वल निकालामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रिद्धी हनुमंत पासले हिने 97.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. श्रद्धा शहाजी इंगळे हिने 96.00 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. सिद्धी हनमंत पासले व वीरश्री विजय सरक यांनी प्रत्येकी 94.40 टक्के गुण मिळविले. तसेच प्रज्ञा यादवराव सुतार 93.80 टक्के, वैष्णवी भगवान दाढे 92.60 टक्के, प्रांजल विजय खपाले 92.20 टक्के, सायली भालचंद्र गुंड 91.80 टक्के, प्राची महादेव पवार व श्रेया नागनाथ करंडे यांनी प्रत्येकी 91.60 टक्के, श्रावणी अच्युत शेटे 91.00 टक्के, राजनंदनी विजयसिंह पाटील, ऋतू हर्षल कुलकर्णी व संचिता संजय थिटे यांनी प्रत्येकी 90.20 टक्के गुण मिळवून विद्यालयाच्या यशात भर घातली.
या यशाबद्दल राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष माजी आमदार राजन पाटील, विक्रांत (बाळराजे) पाटील, अजिंक्यराणा राजन पाटील, प्रियांका पाटील, प्राजक्ता पाटील, माजी प्राचार्य चंद्रकांत ढोले , प्राचार्य महादेव चोपडे , उपप्राचार्य माधव खरात, पर्यवेक्षक राजेंद्र डोके आदी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

No comments:
Post a Comment